शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वस्त्यांमध्ये महिनाभरापासून पाणी साचले; अनारोग्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:59 IST

नागपूर शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देआले तलावाचे स्वरूपमनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.प्रभाग क्रमांक २९ मधील गुलमोहर कॉलनी लगतच्या समाधान नगर परिसरात पाणी साचून आहे. येथे रस्त्याचे डांबरीकरण केले परंतु पावसाळी नाली व गडरलाईन न टाकल्याने रिकाम्या प्लॉटवर पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे.

प्रभाग २८ मधील रामकृष्ण नगर, सेनापती नगर, सर्वस्वी नगर व योगेश्वर नगर यासह अनेक वस्त्यांत पाणी साचून आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नारा, नारी, प्रभाग ३ मधील विनोबा भावे नगर, प्रभाग ६ मधील यादव नगर, चिमूरकर ले-आऊट, एकता कॉलनी, हाउसिंग बोर्ड कॉलनी, पंचशील नगर व हनुमान सोसायटी, प्रभाग २५ मधील पारडी, विनोबा भावे नगर, प्रभाग २६ मधील वाठोडा ले - आऊट, प्रभाग ३४ मधील बेलतरोडी यासह अनेक वस्त्यांत पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी नाल्या व गडरलाईनची व्यवस्था नसल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने परिसर अजूनही जलमय आहे.धूर व औषध फवारणीची मागणीबदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घोंगावणाऱ्या डासांनी नागरिकांची झोप उडविली आहे. रात्री आणि दिवसादेखील डासांपासून सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करण्याची मागणी होत आहे.बगिच्यातही डासांचा त्रासमैदाने, बगिच्यांमध्ये तर संध्याकाळी आणि रात्रीच नव्हे तर दिवसाही डास घोंगावत असल्यामुळे लहान मुलांसह मोठ्या माणसांनाही या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह पाणी साचणाऱ्या आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतील, मात्र प्रशासनाकडून मागणीनंतरही फवारणी केली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका