शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदारांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेचे स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदार सोनू इलेक्ट्रिकल्स, बालाजी असोसिएटस् व अनिल इलेक्ट्रिकल्स अ‍ॅन्ड असोसिएटस् यांना दणका दिला. बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, ही या कंत्राटदारांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. यासंदर्भात कंत्राटदारांनी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज करण्यात आला.

ठळक मुद्देहायकोर्ट : बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यास नकार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेचे स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदार सोनू इलेक्ट्रिकल्स, बालाजी असोसिएटस् व अनिल इलेक्ट्रिकल्स अ‍ॅन्ड असोसिएटस् यांना दणका दिला. बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, ही या कंत्राटदारांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. यासंदर्भात कंत्राटदारांनी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज करण्यात आला.महापालिकेने शहरातील रोडवर लावण्यासाठी चक्क ९,९०० रुपये नगाप्रमाणे एलईडी लॅम्पस् खरेदी केले आहेत. त्यात १०० कोटीवर रुपयांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल आहेत. न्यायालयाने गेल्या तारखेला सर्व कंत्राटदारांची बिले थांबविण्याचा आदेश दिला. त्यावर वरील तीन कंत्राटदारांचा आक्षेप होता. बँकेचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे तो आदेश मागे घेण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. याशिवाय कंत्राटदारांनी अन्य एक अर्ज दाखल करून, या प्रकरणात प्रतिवादी करून घेण्याची विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने मंजूर करून या कंत्राटदारांना प्रकरणात प्रतिवादी करून घेण्याचा आदेश दिला. तसेच, कंत्राटदारांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. याचिकांवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे व अ‍ॅड. अमृता गुप्ता यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरणमहापालिकेने बाजारात अवघ्या ३,४०० रुपये नगाप्रमाणे मिळू शकणारे स्ट्रीट एलईडी लॅम्पस् चक्क ९,९०० रुपये दराने खरेदी केले आहेत. हा एकूण ४७० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्यातून मनपा १ लाख ३८ हजार एलईडी लॅम्पस् खरेदी करणार आहे. या खरेदी व्यवहाराचा संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात यावा, मनपा खरेदी करणार असलेले एलईडी लॅम्पस् व बाजारात उपलब्ध असलेले एलईडी लॅम्पस् यांची गुणवत्ता व किमतीची तज्ज्ञांमार्फत तुलना करून अहवाल मागविण्यात यावा व या गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका