शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमध्ये कौशल्य प्रयोगशाळा  : राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:44 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे३ कोटी ६३ लाखांच्या उपकरणाला मंजुरी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे. कौशल्यावर आधारित पहिली अद्ययावत प्रयोगशाळा मेडिकलमध्ये सुरू होणार आहे. यासाठी शासनाने ३ कोटी ६३ लाखांच्या ‘ऑर्थाेपेडिक व गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ उपकरणाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. असे अद्ययावत प्रयोगशाळा असलेले हे पहिले रुग्णालय ठरणार आहे.‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच काही प्रमाणात प्रात्यक्षिकाचाही अभ्यास करावा लागतो. पदव्युत्तर अभ्यासक्रम हा पूर्णत: प्रात्याक्षिकांवर आधारित असतो. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचे कौशल्य आत्मसात करता यावे, अशा प्रयोगशाळेसाठी मेडिकलने कौशल्य प्रयोगशाळेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे आहे. या प्रयोगशाळेत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उपचाराशी निगडित प्राथमिक कौशल्ये, ‘कॅडव्हरिक डिसेक्शन’, ‘हॅण्ड्स ऑन वर्कशॉप’चाही लाभ एकाच छताखाली आत्मसात करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र आणि अस्थिरोग विभागाच्या विद्यार्थ्यांना येथे सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुडघा, हिप, एलबो रिप्लेसमेंट यांसारख्या शल्यक्रियांसोबतच प्रसुतीदरम्यान होणारी गुंतागुंत हाताळण्याचे कौशल्यही आत्मसात करता येणार आहे. दुसºया टप्प्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत व्हर्च्युअल अ‍ॅनॉटॉमिकल डिसेक्शन आणि अल्ट्रासाउंड डिसेक्शनचे कौशल्यही आत्मसात करता येईल.पुढील सहा महिन्यात सेवेत असेल प्रयोगशाळाविद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी मेडिकलमध्ये प्राथमिक उपकरणे आहेत. आता यात ‘ऑर्थाेपेडिक व गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ची भर पडणार आहे. या उपकरणांसाठी औषध भांडार इमारतीमधील वरच्या माळ्यावरील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हाफकिनमार्फत उपकरणांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच येत्या सहा महिन्यांत ही प्रयोगशाळा सेवेत असेल.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय