शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या वेळात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:47 IST

कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व तंत्र विकासाचे प्रशिक्षण तज्ज्ञाकडून देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व तंत्र विकासाचे प्रशिक्षण तज्ज्ञाकडून देण्यात आले.लॉकडाऊन दरम्यान विविध राज्यातील स्थलांतरित मजूर नागपुरात अडकलेत. त्यांना महापालिकेने उभारलेल्या निवारागृहात ठेवण्यात आले. याशिवाय शहरातील बेघर लोकांना देखील मनपाने या संकटसमयी आश्रय दिला. यावेळी त्यांना मानसिक आधार मिळण्यासह भविष्यात त्यांनी रोजगाराचे साधन निर्माण करावे यासाठी विविध संघटनांच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. या संघटनांनी निवारागृहातील लोकांचे सकारात्मक समुपदेशन तर केलेच पण सोबत उद्योजकता व कौशल्य विकासाचे, तंत्राचे सोप्या भाषेत प्रशिक्षण देखील दिले. या कौशल्याचा उपयोग अर्थार्जन व रोजगार निर्मिती साठी करू अशी हमीदेखील सहभागी लोकांनी दिली. या कौशल्य विकास कार्यक्रमात पावसाच्या पाण्याचे नियोजन, औषधी व इतर उपयोगी रोपांची नर्सरी, पाणी व मृदा संवर्धन, बांधकाम क्षेत्रातील नवीन संधी व रद्दी पेपरपासून घरबसल्या उपयोगी लिफाफे व इतर वस्तू बनवण्याची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव न्या. अभिजीत देशमुख यांनी निवारागृहाला भेट देऊन कौशल्य विकास उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सिटी मिशन मॅनेजर विनय त्रिलोकीवार तसेच इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सोसायटीचे अर्शद तन्वीर खान, ईकॉन्सस फाऊंडेशनचे डॉ. समीर देशपांडे व डॉ. मुनमून सिन्हा, समीर पटेल, आपुलकी सामाजिक संस्थेचे अमिताभ पावडे, मुद्रास चॅरिटेबल सोसायटीच्या रूपम झा देवांगण, प्रभात धारीवाल, पवन गजभिये व मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य लाभले.

टॅग्स :Migrationस्थलांतरणnagpurनागपूर