शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

एसजेएएन क्रिकेट; नागपूर लोकमत पुन्हा चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:40 AM

लोकमत संघाने गतविजेत्या टाइम्स ऑफ इंडियावर ५ धावांनी विजय नोंदवून २२ व्या एसजेएएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवले.

ठळक मुद्देरोमहर्षक अंतिम लढतीत टीओआयवर ५ धावांनी मात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या रोमहर्षक अंतिम लढतीत लोकमत संघाने गतविजेत्या टाइम्स ऑफ इंडियावर ५ धावांनी विजय नोंदवून २२ व्या एसजेएएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. याआधी दोनदा जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर लोकमतने यंदा चॅम्पियन बनण्याचा मान मिळविला हे विशेष.दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर गुरुवारी खेळविण्यात आलेल्या निर्णायक लढतीत लोकमतने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा उभारल्या. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज नितीन श्रीवास याने पडझड रोखून धावसंख्येला आकार देत चार चौकार आणि तीन षटकारांसह ५० चेंडूत सर्वाधिक ७२ धावांचे योगदान दिले. सचिन खडके (२६ धावा, ३० चेंडू, ४ चौकार आणि सारंग वळुंजकर(नाबाद १४, १० चेंडू, १ चौकार यांनी नितीनला समर्थ साथ दिली. टीओआयकडून फिरकीपटू राममूर्ती नेरले याने २३ धावात २ तर संदीप दाभेकर, पीयूष पाटील, संदीप वर्धने आणि विनय पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.प्रत्युत्तरात टीओआयने विजयाचा शानदार पाठलाग केला होता. विनय पांडेने ५२ चेंडूत ६७ ,प्रतीक सिद्धार्थने २९ चेंडूत ३० तसेच रूपेश भाईकने १६ चेंडूत २४ धावांचे योगदान देत विजय दृष्टिपथात आणण्याचा प्रयत्न केला. तथापि दडपणातही सचिन खडके याने भेदक मारा करीत लोकमतसाठी विजय खेचून आणला. विनय पांडे बाद होताच सामना फिरला. अखेरच्या षटकात टीओआयला दहा धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर त्यांना चार धावा मिळाल्या, मात्र त्यानंतर सचिनच्या माºयापुढे टीओआयच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरी करताच लोकमतने विजयावर शिक्कामोर्तब केले. लोकमतकडून सचिन खडके याने २० धावात ३३, तर प्रवीण लोखंडे आणि शरद मिश्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.पुरस्कार वितरण ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय, स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर, क्षेत्रीय व्यवस्थापक फनिश गुप्ता, एचसीएलचे वित्त व सेवा प्रमुख गौरीशंकर,ज्येष्ठ क्रीडा संघटक अनिल अहिरकर, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे आणि बीएससी उपाध्यक्ष चंद्रशेखर कारकर यांच्या उपस्थितीत झाले. एसजेएएन अध्यक्ष किशोर बागडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले व आभार मानले.

टॅग्स :Lokmatलोकमत