शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ललित, मोना, रौनक, मालविका, तायवाडे यांना एसजेएएन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:03 IST

स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन)आयोजित आणि रायसोनी समूहातर्फेपुरस्कृत १९ वा वार्षिक क्र ीडा पुरस्कार वितरण सोहळा यंदा ५ (रविवार) नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता माजी आॅल इंग्लंड बॅडमिंटन विजेते प्रकाश पदुकोण यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रकाश पदुकोण मुख्य अतिथी : ५ नोव्हेंबर रोजी वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन)आयोजित आणि रायसोनी समूहातर्फेपुरस्कृत १९ वा वार्षिक क्र ीडा पुरस्कार वितरण सोहळा यंदा ५ (रविवार) नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता माजी आॅल इंग्लंड बॅडमिंटन विजेते प्रकाश पदुकोण यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे.रामदासपेठस्थित हॉटेल सेंटर पॉर्इंंटमध्ये होणाºया या सोहळ्यात क्र ीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विदर्भाचा रणजी क्रि केटपटू ललित यादव, भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार मोना मेश्राम, युवा बुद्धिबळपटू रौनक साधवानी, आंतरराष्टÑीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ.बबनराव तायवाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी पत्रपरिषदेत विजेत्यांची नावे जाहीर केली. नीलेश देशपांडे, नरेंद्र चोरे, अमित रामटेके, संदीप दाभेकर यांच्या समितीने पुरस्कारार्थी निवडले. वर्षभरात शालेयस्तरावर उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल वर्धमाननगर येथील स्वामीनारायण स्कूलला उत्कृष्ट शाळेचा तसेच महाविद्यालयीनस्तरावर यशस्वी कामगिरी केल्याबद्दल आर. एस. मुंडले धरमपेठ आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेज संघाचा गौरव करण्यात येईल.सिनियर पुरुष गटात विदर्भ क्रि केट संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज ललित यादव याला पुरस्कृत करण्यात येईल. ललितने गतवर्षी २१.२९ च्या सरासरीने ३० गडी बाद केले.सिनियर गटात पुरस्काराची मानकरी असलेली मोना मेश्राम हिने इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयतर्फे देण्यात येणाºया एम. ए. चिदंबरम पुरस्काराची मानकरी ठरली होती. बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामिगरी करणारा रौनक साधवानीने द.कोरियातील आशियाई युथ बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. नवी दिल्लीतील कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत तो १० वर्षे गटाचा सुवर्णविजेता होता. रौनकला ज्युनियर मुलांच्या गटात तसेचकराड येथे आयोजित राज्य ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत विजेती ठरलेली मालविका बन्सोड हिला ज्युनियर मुलींच्या गटाचा पुरस्कार प्रदान करण्यात येईलधनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी विविध क्र ीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले. खेळाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करीत क्र ीडाक्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक हा पुरस्कार दिला जाईल.पुरस्कार वितरण समारंभाला रायसोनी ग्रुपचे चेअरमन सुनील रायसोनी, आ.समीर मेघे, बैद्यनाथचे सहव्यवस्थापक संचालक सुरेश शर्मा, बँक आॅफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक आनंद कोठीवान उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला रायसोनी स्पोर्टस् अ‍ॅन्ड कल्चरल अकॅडमीच्या संचालक मृणाल नाईक आणि जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे उपस्थित होते.