शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:06 IST

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवाडीत उद्रेक नगर परिषदेकडे सक्षम आरोग्य यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान तीन वर्षापासून वाडीला नगर परिषद घोषित केल्याने नगर परिषदेकडे आरोग्य यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली आहे.आंबेडकरनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही नाल्यातून गेली आहे. तसा वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसापासून वेणा जलाशयातून पाणी बंद केले आहे. त्यामुळे टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टँक रद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने काविळ परिसरात पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसापासून आजार पसरले असून स्वाती गायकवाड यांना नुकत्याच जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासूनच आई आणि दोघी जुळ्या मुली काविळसदृश आजाराने ग्रस्त होत्या.या तिघांचाही मृत्यू काविळने झाल्याचे बोलले जात आहे. काविळचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेता, जि.प.च्या आरोग्य विभागाने वाडीमध्ये इपॅडेमिक सेल तयार केला आहे. दोन डॉक्टरची तिथे नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आहे. ग्रा.पं.ला मेडिक्लोर दिले असून, पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी दिली आहे.

आरोग्य यंत्रणा उभी करावीवाडीमध्ये यापूर्वीही साथ रोग पसरला होता. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पण नगर परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दरवेळी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग धावपळ करून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाडीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्याने नगर परिषदेने स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य