शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सहा टन प्लास्टिक जप्त : मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:21 IST

मंगळवारी गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने छापा घालून पाच लाखांचे सहा टन प्लास्टिक जप्त केले.

ठळक मुद्देगांजाखेत येथील व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. महापालिकेतर्फे आजवर प्रामुख्याने छोट्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात होती. परंतु यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झालेला नाही. याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्लास्टिकचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने छापा घालून पाच लाखांचे सहा टन प्लास्टिक जप्त केले.प्राप्त माहितीनुसार, गोळीबार चौकालगतच्या गांजाखेत येथील गुरुनानक स्टोअर्सच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित दुकानाच्या गोदामावर छापा मारला. यात सुमारे ५९५२ किलोच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. दुकानाचे मालक ओमप्रकाश वाधवानी हे गोदामातून चिल्लर व्यापाऱ्यांना हा माल पुरवीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.शासनाची बंदी असतानाही अनधिकृतरीत्या साठा आढळल्यामुळे शासन नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. यापूवीर्ही या परिसरातून तीन लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला होता.काही दिवसांपूर्वी बर्डी परिसरातही उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करून प्लास्टिक साठा जप्त केला होता. सदर कारवाई स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाच्या सदस्यांनी केली.८७६ प्रकरणात ४४ लाखांचा दंड वसूलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे प्लास्टिक मुक्त शहरचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच प्लास्टिक बंदी निर्णयाची महापालिका क्षेत्रात कडक अंमलबजावणी सुरू आहे. मनपा आरोग्य विभाग(स्वच्छता) आणि उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येते. दहाही झोनअंतर्गत सुमारे ८७ जणांचे पथक झोननिहाय कार्यरत आहे. शहरात आतापर्यंत उपद्रव शोध पथकाने ८७६ प्रकरणातून सुमारे ४४ लाखांवर दंडात्मक कारवाई केली आहे.प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावापर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने प्लास्टिक बंदी नियमांतर्गत महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनीही यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, शहरातील मोठे व्यावसायिक अथवा चिल्लर दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल त्याची माहिती महापालिका अधिकारी किंवा उपद्रव शोध पथकाला द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी