शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

सहा दिवसात सहा हजार कोटींचे कलेक्शन

By admin | Updated: November 17, 2016 03:14 IST

केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० तारखेपासून बुधवारपर्यंत राष्ट्रीयीकृत,

बँकेत रांगा कायमच : दोन दिवसात ५०० च्या नवीन नोटा येणारनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० तारखेपासून बुधवारपर्यंत राष्ट्रीयीकृत, खासगी, नागरी अर्बन बँकांच्या ६०० पेक्षा जास्त शाखा आणि पोस्टाच्या विविध कार्यालयातून नागपुरात जवळपास सहा हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटांचे कलेक्शन झाल्याची अधिकृत माहिती आहे.नागपुरातील १७ नागरी अर्बन बँकेच्या जवळपास ३००० पेक्षा जास्त शाखांच्या माध्यमातून १ हजार कोटी रुपये ग्राहकांनी जमा केले आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे.(प्रतिनिधी)बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये २०० कोटी जमाबँक आॅफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले की, बँकेच्या नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथील ६५ शाखांच्या माध्यमातून बँकेत सहा दिवसात २०० कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. शिवाय ८० कोटींच्या जुन्या नोटा ग्राहकांना बदलवून दिल्या आहेत. बँकेतर्फे अमरावती आणि रायपूर झोनमध्ये नवीन चलनी नोटा पाठविण्यात येत आहे. लोकांनी बँकेतून १०० आणि ५० रुपयांच्या नोटा नेल्या, पण त्या बाजारात दिसत नाही. लोकांनी त्या नोटा चलनात आणाव्यात. दोन दिवसात ५०० रुपयांच्या नवीन नोटा बँकेत येणार आहे. त्यानंतर रांगा कमी होतील, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.बंद फर्मवर आयकर खात्याची नजरअनेक ग्राहक बंद असलेल्या फर्मच्या खात्यात जुन्या नोटा भरत आहे. अशा खात्यावर आयकर खात्याची नजर आहे. ३० डिसेंबरनंतर या खात्याची चौकशी होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सहा दिवस भरणा भरणारे जास्त आणि रक्कम काढणारे कमी दिसून आले. एटीएममधून दरदिवशी मिळणारे अडीच हजार रुपये खर्चासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे अनेकांनी प्रारंभी धनादेशाद्वारे १० हजार रुपये बँकेतून काढले. ग्राहकांना बचत खात्यातून आठवड्यात २४ हजार आणि चालू खात्यातून ५० हजार रुपये काढता येणार आहे. सर्व बँकांच्या शाखांमध्ये गर्दीनागपुरात राष्ट्रीयीकृत, खासगी आणि पोस्टाच्या शाखांमध्ये ग्राहकांनी जुन्या नोटांचा भरणा केला. स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, युनियन बँक यासह अन्य बँका तसेच अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, कोटक महिन्द्र, आयडीबीआय या बँकांच्या शाखांमध्ये लोकांनी कोट्यवधींचा भरणा केला. सर्व बँकांचा विचार केल्यास सहा दिवसात सहा हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटा सर्व शाखांमध्ये जमा झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ३० डिसेंबरपर्यंत मुदत असल्यामुळे मोठे रक्कम भरणारे नंतर येतील, असे त्यांनी सांगितले.