शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिनी नागरिकांसह सहा जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:26 IST

गोमांस तस्करीप्रकरणी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चिनी नागरिकांसह सहा जणांना एक महिन्याची कैद किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील खापा येथील गोमांस तस्करी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बडेगाव) : गोमांस तस्करीप्रकरणी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चिनी नागरिकांसह सहा जणांना एक महिन्याची कैद किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ली झी च्युन (५५), ल्यु युन चेंग (५१), ल्यु हाँग ग्वॉँग (५१) यांच्यासह वाहनचालक अफरोज मो. शेख (२९), दुभाषक देवेंद्र लालजी नगराळे (३१) रा. निमगाव आणि गोमांस विक्रेता वकील मो. आजम कुरैशी रा. खापा, अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सावनेर तालुक्यातील खापा पोलिसांनी १८ जानेवारीला गुप्त माहितीच्या आधारे गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनास पकडत खापा येथे चालत असलेल्या गोमांस खरेदी-विक्री प्रकाराचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामधे तीन चिनी नागरिकांचाही समावेश होता. त्यांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले होते. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव मॅगनीज खदान परिसरात चीनमधील एक कंपनी मॉयलसह संयुक्तपणे खदान विस्तारीकरणाचे काम करीत आहे. यामुळे येथे चिनी तंत्रज्ञ आणि कामगारही प्रकल्पात कामाला आहेत. चिनी कामगारांच्या मदतीला दुभाषक तसेच बाजारहाट आणि इतर कामांसाठी एक वाहन कंपनीने पुरविले होते. चिनी कामगार गोवंशीय मांसाहार घेतात आणि त्यामुळे ते गुप्तपणे मांस खरेदी करतात, अशी माहिती खापा पोलिसांना मिळाली. खबऱ्याद्वारे १८ जानेवारीला मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नाकाबंदी करून एमएच ४० बीई ९४९७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला ताब्यात घेतले. वाहनात सापडलेले अंदाजे १० किलो मांस हे गाईचे असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त होताच, तीन चिनी कामगार आणि इतर तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या विविध कलमाखाली अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. चिनी नागरिकांना भारतातील प्राणी संरक्षण कायद्याची माहिती नसल्याने आणि दुभाषकानेही न सांगितल्याने आमच्या हातून गुन्हा घडल्याचे त्यांनी कबूल केले. आरोपींनी न्यायालयात गुन्हा कबूल केल्यानंतर सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नुकतीच सर्व गुन्हेगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड किंवा एक महिना कैदेची शिक्षा सुनावली.

 

टॅग्स :Courtन्यायालयbeefगोमांसchinaचीन