राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिला निधी नागपूर : पश्चिम नागपुरातील दाभा प्रभागात वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या पुढाकाराने तब्बल सहा कोटींच्या विविध विकास कामांना गती मिळाली आहे. राजेंद्र मुळक यांनी दाभा प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागात विविध ठिकाणी भेटी घेतल्या. त्यावर कृती कार्यक्रम आखून त्यामध्ये सुमारे ७८ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात पंडित नेहरू शाळा ते जगदीशनगरला जोडणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १५ लाख, वासनिक कॉलेज ते गणेशनगर रस्त्यांपर्यंत डांबरीकरणासाठी १५ लाख, गव्हर्नमेंट प्रेस ले-आऊट ते वैष्णव माता हाऊसिंग सोसायटी, मंगलमूर्ती ले-आऊट रस्ता डांबरीकरण ३० लाख, आशादीप हाऊसिंग सोसायटी, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, बाळाभाऊपेठ हाऊसिंग सोसायटी रस्ता डांबरीकरण ८ लाख, शुभारंभ हाऊसिंग सोसायटी, वेलकम हाऊसिंग सोसायटी रस्ता डांबरीकरण १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर ५ कोटी ५६ लाख रुपयांची कामे मंजूर होऊन निविदास्तरावर आहेत. त्यामध्ये अमरावती रोड मौजा काचीमेट ते दाभा बोर नाल्यापर्यंत मुख्य मलवाहिका टाकणे १.१० लाख, १९०० ले-आऊटअंतर्गत विविध अभिन्यासातील रस्त्यांच्या खडीकरणाकरिता ४.२९ कोटी, गणेशनगर येथील स्ट्रॉर्म ड्रेनेज पाईपलाईन टाकणे १७ लाख इत्यादी कामांचा समावेश आहे. दाभा प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांनी राजेंद्र मुळक यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले. यात हरीश ग्वालबंशी, स्वानंद धवड, राजू वासनिक, दर्शनी धवड, सुषमा ढोक, निसार खान, श्याम मंडपे, जगदीश भातखोरे, पांडुरंग गजभिये, राकेश दोहारे, समीर काझी, संतोष टेकाम, विजय तिडके, सायमन रनिया, अरविंद मसराम, प्रभुदास गणवीर, संजय रहाटे, उत्तम शेडामे, नारनवरे गुरुजी आदींचा समावेश आहे.(प्रतिनिधी)
पश्चिम नागपुरात सहा कोटींची कामे
By admin | Updated: August 17, 2014 00:50 IST