शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बैठी जीवनशैली, जंक फूड मधुमेहाला पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:07 IST

जंक फूड, फास्ट फूडचे प्रमाण खाद्यपदार्थामध्ये वाढल्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ‘फॅट्स’ वाढू लागले आहेत. परिणामी, प्रचंड सुटलेले शरीर, लहान वयात होणारे मधुमेह, हृदयरोग या समस्यांना आजच्या पिढीला सामोरे जावे लागत आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पाणीकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. राजीव व संजीव वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगमेहनतीची कामे करण्याची श्रम संस्कृती जाऊन बैठी कामे करण्याची जीवनशैली आपण स्वीकारल्यामुळे वजन वाढण्याची समस्या गेल्या काही वर्षात सतत वाढत आहे. त्याच्या जोडीला जंक फूड, फास्ट फूडचे प्रमाण खाद्यपदार्थामध्ये वाढल्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ‘फॅट्स’ वाढू लागले आहेत. परिणामी, प्रचंड सुटलेले शरीर, लहान वयात होणारे मधुमेह, हृदयरोग या समस्यांना आजच्या पिढीला सामोरे जावे लागत आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पाणीकर यांनी व्यक्त केले.डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया व अ‍ॅकडमी ऑफ मेडिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राजीव व संजीव वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यानमालेत ते इन्सुलिन व मधुमेहावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते.डॉ. पाणीकर म्हणाले, मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणापैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरु पात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहे. परंतु मधुमेहाच्या उंबरठ्यावर असणारे, ज्यांना मधुमेह आहे ते स्वत: आणि ज्यांना मधुमेहाविषयी माहिती आहे ते सुद्धा याला गंभीरतेने घेत नाही.डॉ. पाणीकर म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपानामुळे हल्ली लहान मुलांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा मुलांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. पूर्वी चाळिशी ओलांडल्यावर मधुमेहाचे रु ग्ण दिसून येत. मात्र, गेल्या पाच सहा वर्षांत २५ ते ३० या वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: शहरात हे प्रमाण मोठे आहे, असेही ते म्हणाले.व्याख्यानमालेनंतर डा. परिमल तयाडे यांनी मधुमेहाचा आव्हानात्मक बाबी सादर केल्या. गटचर्चेत डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. सचिन गुप्ता, डॉ. किरण बेलसरे व डॉ. सुनील गुप्ता यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. जनजागृती कार्यक्रमात डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. विजय पाणीकर आदींनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संचालन डॉ. संकेत पेंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सचिन सुर्यवंशी, सचिव डॉ. प्रशांत गोवर्धन, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. अजय अंबाडे व व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. किरण कुळकर्णी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य