शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:21 IST

संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देहेमंत व अर्चना जोशी यांची जनजागृती : पर्यटन वाढण्यास होईल मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे. नागपूरकरांनी ही मागणी लावून धरावी यासाठी डॉ. हेमंत जोशी व अर्चना जोशी जनजागृती अभियान राबवित आहे.सीताबर्डी किल्ल्याचे नाव घेताच आठवते ती किल्ल्याची लढाई. या लढाईला आता २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या २४ व्या रेजिमेंटच्या सैन्याचा डोळा होता. नागपूर जिंकण्यासाठी या टेकडीचे महत्त्व लक्षात घेता, इंग्रज अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १८१७ रोजी युद्धाला सुरुवात केली. राजे आप्पासाहेब भोसले यांनी युद्धात नेतृत्व करीत होते. त्यांच्या सैन्याने तीन दिवस ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र इंग्रजांसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. लढाईनंतर ही टेकडी इंग्रज लष्कराच्या ताब्यात गेली आणि भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी टेकडीवर असलेल्या आऊटपोस्टच्या ठिकाणी जानेवारी १८२२ मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण केली. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात या किल्ल्यातील तुरुंगात डांबून ठेवले होते. १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी येथे फाशी दिली होती. सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असून येथे ११८ इन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) ग्रेनेडियर्सचे वास्तव्य आहे. सैन्याने या सर्व आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत.सीताबर्डी किल्ल्यावर मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे म्युझियम व्हावे, युद्धस्मारक तयार व्हावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर, हैद्राबादचा किल्ला अशा सगळीकडे किल्ला रोज बघता येतो. तेथील किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो च्या माध्यमातून, ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो तसा सीताबर्डी किल्ल्यावर व्हावा. त्यामुळे नागपूरचे पर्यटन वाढेल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. किल्ल्याचा परिसर हा ८७० एकरामध्ये पसरला आहे. एवढ्या परिसरात बटालियनचे केवळ १०-१२ जवान तैनात आहेत. सामान्यांसाठी दररोज किल्ला खुला झाला तर दररोज फिरता येईल आणि इतिहास जाणता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शहरातील नागरिकांनी ही मागणी लावून धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Fortगडnagpurनागपूर