शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

भावाने कापला बहिणीचा गळा

By admin | Updated: August 18, 2016 02:19 IST

मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली.

आरोपी भावाला अटक : तातडीने उपचार मिळाल्याने वाचला जीव नागपूर : मोबाईलवर बोलत असल्याने संतापलेल्या भावाने आपल्या बहिणीचा चाकूने गळा कापला. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील कडबी चौकात घडली. रक्षाबंधनाच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जखमी तरुणीला तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मिताली रणवीर चौहान (३०) असे जखमी बहिणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी ३७ वर्षीय भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज चौहान याला अटक केली आहे. मितालीचे कुटुंबीय कडबी चौकातील प्रियदर्शिनी अपार्टमेंटमध्ये राहतात. कुटुंबात आई-वडील, भाऊ राजेश उर्फ ऋत्वीज, लहान बहीण चिन्मयी आहेत. वडील रणवीर हे आकाशवाणीतून सेवानिवृत्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चौहान यांच्या घरी नेहमीच भांडण होत होते. काही दिवसांपासून मिताली खूप त्रासली होती. चौहान कुटुंबांची शेजाऱ्यांसोबतही जास्त बोलचाल नव्हती. त्यामुळे शेजारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. पोलीस सूत्रानुसार बुधवारी सकाळी राजेश उर्फ ऋत्वीज आणि मिताली यांच्यात नेहमीप्रमाणे वाद झाला. मितालीने ऋत्वीजला आंघोळ करण्याचा आणि स्वच्छतेने राहण्याचा सल्ला दिला. यावर ‘तू मला ज्या दिवशी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हापासूनच माझी प्रकृती बरोबर राहत नसल्याचे म्हणत’ तो वाद घालू लागला. यापूर्वीही त्याने अनेकदा ‘बेडरूममध्ये मोबाईलवर कुणाशी बोलत असते’, असे म्हणत मितालीशी वाद घातला होता. मोबाईलवरून ऋत्वीजने पुन्हा प्रश्न उपस्थित केल्याने मिताली त्याला समजावू लागली. दरम्यान संतापलेल्या राजेशने भाजी कापण्याच्या चाकूने मितालीच्या गळ्यावर वार केला. मितालीची आरडाओरड ऐकून शेजारी त्यांच्या फ्लॅटमध्ये पाहोचले. मितालीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी लगेच पाचपावली पोलिसांना सूचना दिली. डीसीपी अभिनाश कुमार, ठाणेदार राजू बहादुरे, महिला पीएसआय एम.एम. मोकाशे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मितालीला अगोदर खासगी रुग्णालयात नेले त्यानंतर मेयो रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी ऋत्वीजला लगेच अटक केली. पकडल्या गेल्यावर तो वेड्यासारखे वर्तन करू लगला. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे कुु टुंबीयांचे म्हणणे आहे. मितालीचे कुटुंब चार वर्षांपूर्वीच प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. ते येथे भाड्याने राहत होते. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद राहायचे. कुणी भेटायला आला तर दरवाजा उघडायलासुद्धा खूप वेळ लावायचे. मिताली आणि तिच्या बहिणीला कुणाशीही बोलू दिले जात नव्हते. (प्रतिनिधी) जीवाला धोका असल्याची होती जाणीव मितालीला तिच्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती. ऋत्वीजने तिचा गळा आवळल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले होते. ऋत्वीजकडून तिच्या जीवाला धोका असल्याचेही सांगत शेजाऱ्यांना मदत करण्याची विनंतीसुद्धा केली होती. दोन दिवसांपूर्वीच वाचला जीव असेही संगितले जाते की, मितालीने दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना तिने एक पाय बालकनीतून बाहेर काढला होता, त्याचवेळी शेजाऱ्यांनी तिला पकडून वाचविले होते.