शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : साधारणत: महिनाभरापूर्वीच सोयाबीन, धान या पिकांकरिता महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता आभाळ गडबड करीत आहे. इकडे पाऊस बरसला की तिकडे शेतकरी पेरते होतील. दिवस कमी. पूर्वमशागतीच्या अखेरच्या टप्प्यात वेळही कमी. अशा अटीतटीच्या नेमक्या वेळीच नोंदणी केलेली बियाणे हातात नाहीत. या संपूर्ण अव्यवस्थेमुळे हतबल होत मोठ्या काकुळतीने ‘साहेब, घात गेल्यावर बात करणार काय?’ असा संतापजनक सवालच शेतकरी महाबीज महामंडळास करताना दिसत आहेत.

महाबीज बीजोत्पादन योजना शासनाचा उपक्रम असल्याने फसवणुकीचा गोरखधंदा अजिबात नसतो. अशी खात्री शेतकऱ्यांना असल्याने असंख्य शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करीत असतात. शिवाय, प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे दिसून येतो. मागील काही वर्षांत मात्र सोयाबीनबाबत शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. अशातही अनेक शेतकऱ्यांची बीजोत्पादनासाठी नोंदणी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील एकूण ३२५ शेतकऱ्यांनी महाबीज बीजोत्पादन आरक्षण योजनेत नोंदणी केली आहे. एकूण १,१४४ हेक्टरसाठी ही नोंदणी झाली असून, यामध्ये सोयाबीन ९५८ हेक्टर, धान १४३ तर तूर केवळ ४३ हेक्टरसाठी मागणी झाली असल्याची बाब महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरुटकर यांनी सांगितली. बियाणे येणे सुरू असून, लवकरच वितरणाचेही काम ताबडतोब करीत आहोत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण ३५ वितरकांच्या माध्यमातून सबवितरकाकडे बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन पूर्णत्वास आले असून, कृषी केंद्रासाठी ६,६३० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

....

नोंदणी अधिक, मिळणार किती?

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन योजनेत प्रति बॅग १०० रुपये याप्रमाणे नोंदणी शुल्काचा भरणा करीत बियाणे नोंदविले आहे. आता ऐनवेळी बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असून, नोंदणी केलेल्यांपैकी अर्ध्या बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल, असे महाबीजचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. आधीच विलंब होत आहे. त्यात आता बियाणे कमी मिळत असल्याने आम्ही निराश आणि हताश झालो आहोत, अशी कैफियत रवी मलवंडे, दिवाकर मस्की, माधव राऊत, पुंडलिक पलांदूरकर, रामाजी शहारे, मंगेश नवघरे, अनिकेत भोयर, प्रवीण नवघरे, लक्ष्मण चौधरी आदींनी मांडली आहे.

.....

पोहोचता का नाही?

बी-बियाणे, खते बांधापर्यंत पोहोचवून देण्याचे धोरण महाआघाडी शासनाचे आहे. अशातच आता पेरणीचा हंगाम अगदी जवळ असताना अद्याप बियाण्यांचा पत्ता नाही. शिवाय, मागील वर्षापासून महामंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवून देत नाही. शेतकरी स्वत: स्वखर्चातून नागपूर येथील महामंडळाच्या गोदामातून बियाणे घेऊन जातात. हा अधिकचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. आतापर्यंत गावात पाेहोचता होत असताना मागील वर्षापासून धोरण बदलविण्याचे कारण काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.