शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

साहेब! शरीराशिवाय विकण्यासाठी काहीच उरले नाही

By admin | Updated: December 12, 2015 06:17 IST

अकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा

धरणे मंडपातील सावकारपीडित शेतकऱ्यांची विदारक व्यथानिशांत वानखेडे ल्ल नागपूरअकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा कळसच म्हणावे लागेल. पण साहेब ! शेतकऱ्याईजवळ शरीरातील अवयवाशिवाय विकण्यासारखे आता काहीच उरले नाही, मग करावं काय, असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न धरणे मंडपात बसलेल्या अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्याने विचारला आहे. दुष्काळ, नापिकी अशा परिस्थितीत होरपळल्यानंतरही सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र अशा जीवघेण्या परिस्थितीतही प्रशासनाकडून त्यांची कशी पिळवणूक केली जाते याचे कथन सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रच्या धरणे मंडपात बसलेल्या शेतकऱ्यांनी केले. आंदोलनात बसलेले अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द येथील रामेश्वर वाकोडे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाची हकीकत सांगितली. रामेश्वर यांच्यासह गावातील ६५ शेतकऱ्यांच्या जमिनी एका स्थानिक सावकाराकडे गहाण होत्या. मात्र नियमानुसार अवैध ठरत असलेल्या या सावकाराविरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि जिंकलीही. न्यायालयाने संबंधित सावकारावर कारवाईचे करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकाला दिले. मात्र निबंधकाने कोणतीही कारवाई केली नाही. या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे वाकोडे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या धारवा येथील महादेव घुले या शेतकऱ्यासोबतही हाच प्रकार झाला. जिल्हा निबंधकाने १० जुलै २०१५ला येथील अवैध सावकारावर कारवाई करण्याचे निर्देश सहायक निबंधकाला दिले. मात्र ७ महिने उलटूनही संबंधित अधिकाऱ्याने कुठलीही कारवाई केली नाही. अवैध सावकारावर गुन्हे सिद्ध होऊनही कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रतर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सावकारी कर्जमुक्ती लाभाची कालमर्यादा १५ वर्षावरून ३० वर्षे करण्यात यावी, अवैध सावकारांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी या व इतर मागण्या या संघटनेने केल्या आहेत.(प्रतिनिधी)निबंधकाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचितआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अरुण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील सावकारी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अकोल्याच्या जिल्हा निबंधकाने सावकाराला लाभ पोहचविण्यासाठी त्या सावकाराने संपूर्ण जिल्ह्यात वाटलेल्या कर्जाची यादी जाहीर केली. मात्र नियमानुसार परवानाधारक सावकाराचे कार्यक्षेत्र केवळ तालुक्यापुरते मर्यादित आहे. यामुळे निबंधकाच्या यादीमुळे हा सावकार अवैध ठरला होता. यामुळे सावकाराला वाचविण्यासाठी निबंधकाने तालुक्याच्या कार्यक्षेत्राला नगर असे दर्शविले.