शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

साहेब, भूख से सभी डरते है।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 10:43 IST

सेक्स वर्कर्सना या महामारीने खऱ्याखुऱ्या स्वरूपात रस्त्यावर आणले आहे. आज त्या दोन वेळेच्या जेवणासाठी जीवघेणा धोका पत्करून शरीर विकायला तयार आहेत. मात्र ग्राहकच फिरकेनासे झाल्याने या बिचाऱ्यांच्या वाट्याला नुसतीच अगतिकता आली आहे.

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आँखे, ओठ, दिल और चेहरा,इनकीही सब तारीफ करते है।पेट का जिकर कोई नही करता,हे जळजळीत वास्तव आहे रेडलाईट एरियातील !'कोरोना' या एका शब्दाने लोकांना भयक्रांत करून सोडले आहे. स्पर्श सोडाच एकमेकांना भेटणेही संशयी झाले आहे. पण, स्पर्शानेच ज्यांचे पोट चालते त्या सेक्स वर्कर्सना या महामारीने खऱ्याखुऱ्या स्वरूपात रस्त्यावर आणले आहे. आज त्या दोन वेळेच्या जेवणासाठी जीवघेणा धोका पत्करून शरीर विकायला तयार आहेत. मात्र ग्राहकच फिरकेनासे झाल्याने या बिचाऱ्यांच्या वाट्याला नुसतीच अगतिकता आली आहे.वारंवार झालेला बलात्कार, विश्वासघात, प्रेम प्रकरणातून झालेली फसगत, लादलेले मातृत्व अन जिकडेतिकडे खायला उठत असल्याचा अनुभव पदरी पडल्यामुळे महिला-मुली वेश्या व्यवसाय करण्यास बाध्य होतात. नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर या संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात (मुंबई वगळता) वेगवेगळ्या शहरात सुमारे दीड ते दोन लाख सेक्स वर्कर देहविक्रयाचा व्यवसाय करतात. हा आकडा कमीजास्त होत राहतो.नागपूरच्या गंगाजमुनात मार्चपर्यंत सुमारे तीन हजार वारांगनांचे सारे काही ठीक होते. आता नुसतेच मूक आक्रंदन आहे. येथील वारांगनाजवळचा पै- पैका संपल्यामुळे आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. फूड पॅकेट काय, कुणी चहाही द्यायला तयार नाही. म्हणूनच जगण्यासाठी त्या मरणाचा (कोरोना) धोका पत्करायला तयार आहेत.दुसरे कोणतेही काम त्या करू शकत नाहीत. त्यांना कुणी काम देईल, ही शाश्वतीही नाही. त्यामुळे सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत त्या अगतिकपणे उभ्या दिसतात. ग्राहक येईल आणि दोन वेळेच्या जेवणाची सोय होईल, या अपेक्षेवर त्या ग्राहकांची जीवघेणी प्रतीक्षा करतात. मात्र, एकटदुकटच ग्राहक फिरकत असल्याने अनेकींना पाण्याच्या घोटासोबत भुकेचा आगडोंब पोटात घेऊन झोपावे लागत आहे.सारेच मार्ग बंदवारांगनाचा औषधोपचार आणि समुपदेशनाचे कार्य ‘रेडक्रॉस सोसायटी’ तर्फे केले जाते. सोसायटीच्या प्रमुख हेमलता लोहवे येथील वारांगनांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे सांगतात. पैसा नाही आणि ग्राहकही नाही. त्यात मदतीचे सर्वच मार्ग बंद झाल्यामुळे रोजच्या जगण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याचे सांगतात.येईल का कुणी पुढे ?त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था हवी आहे. कोणती भली माणसं त्यासाठी पुढाकार घेतात, याकडे त्यांची नजर लागली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस