शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:18 IST

उत्तर प्रदेश सरकारने आता डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर सुरू केला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिला.

ठळक मुद्देआमदार प्रकाश गजभिये यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच पदोन्नतीत आरक्षण नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे न्यायालयाकडून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशामुळे हा कायदा ‘दात नसलेला साप’ असा झाला आहे. हे दोन्ही निर्णय अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी समाजावर अन्याय करणारे आहेत. हे तर न्यायालयाच्या माध्यमातून संविधान कमकुवत करण्याचे सरकारचे षडयंत्रच होय. असे असताना मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आता डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर सुरू केला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिला.न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण नाकारले आहे. याचा फटका राज्यातील दीड लाख कर्मचाऱ्यांना बसणार आहे. विशेष म्हणजे संविधानात अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणाची तरतूद केली आहे. यानंतरही न्यायालयाकडून आरक्षण नाकारण्यात आले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात न्यायालयाकडून घेण्यात आलेला निर्णय अन्यायकारक आहे.एकीकडे देशात बेरोजगारीची समस्या गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रत शासनाने गेल्या चार वर्षांपासून नोकर भरती बंद केली असून ३० टक्के नोकर कपातीची घोषणाही केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या कमी झाल्या नाहीत. या मुद्यांपासून भटकविण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.देशात महात्मा गांधी यांचा मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य टिळक यांचा बाळ गंगाधर टिळक, स्वामी विवेकानंद यांचा नरेंद्र दत्त असा उल्लेख करणे चालेल काय, असा सवाल करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमराव रामजी आंबेडकर, असा एकेरी उल्लेख खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पदोन्नतीत आरक्षण आणि अ‍ॅट्रासिटी संदर्भात न्यायालयाकडून आलेल्या निर्णयाच्या विरोधात जनजागृती करणार असल्याचे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रवीण घोडके, रवी पोथारे, संजय सायरे, गोपी भगत, भैया शेलारे, कृष्णा मसराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर