शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

coronavirus; एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:30 AM

एसटी महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय एसटीत ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये जनजागृतीसह इतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात एक पाऊल पुढे टाकत एसटी महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बसमधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयात धडकला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण बसमध्ये बसच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून ती मार्गावर सोडण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये समाजातील विविध घटकांसाठी राखीव आसनांवरील आरक्षण या स्थितीत रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महमंडळाने यापूर्वीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.यात बसस्थानक दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुणे, प्रत्येक बस लिक्विड मिश्रित पाण्याने धुणे, गर्दीच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाºया एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व लिक्विडची बॉटल देणे आणि बसस्थानकावरील उद्घोषणा प्रणालीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करणे सुरु केले आहे. यात एकाच सीटवर एक प्रवासी बसविण्याच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाने एक स्तुत्य निर्णय घेऊन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आपले ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस