शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:59 IST

सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : बँकॉक, दुबई, लंडन, हवानाला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला.व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हे दोन्ही गायक अश्लील गाणी गातात असा जब्बल यांचा आरोप आहे. २७ आॅक्टोबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने या दोघांना सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हनीसिंगने गाण्याच्या कार्यक्रमांकरिता विदेशात जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात सादर माहितीनुसार येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत हनीसिंगचे बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे कार्यक्रम आहेत. विदेशात असताना अटींचे पालन करण्याची समज न्यायालयाने त्याला दिली आहे. हनीसिंगच्या वतीने अ‍ॅड. अतुल पांडे व अ‍ॅड. आशिष किलेदार यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय