शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही नगर पंचायत : अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:31 IST

सिंदेवाही नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला नगरसेविका आशा गंडाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंदेवाही नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील स्थगितीला नगरसेविका आशा गंडाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सुुरुवातीला २४ जून रोजी अध्यक्षपदाची निवडणूक निश्चित केली होती. गंडाते यांनी त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यावर हितेश सूचक यांनी आक्षेप दाखल करून गंडाते निवडणुकीसाठी अपात्र असल्याचा दावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर सूचक यांनी नगर विकासमंत्र्याकडे अपील केले होते. नगर विकासमंत्र्यांनी निवडणुकीवर स्थगिती देऊन ते प्रकरण निर्णयाकरिता विभागीय आयुक्तांकडे वर्ग केले होते. २६ जून रोजी विभागीय आयुक्तांनी सूचक यांचे अपील खारीज केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २९ जून ही सुधारित तारीख जाहीर केली होती. दरम्यान, नगर विकासमंत्र्यांनी २८ जून रोजी वादग्रस्त आदेश जारी करून निवडणुकीवर स्थगिती दिली. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप आहे. हा आदेश अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. रफिक अकबानी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक