शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात दुर्धर आजाराला कंटाळून मायलेकीची एकाचवेळी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:09 IST

आता सहन होत नाही. त्यामुळे खूप विचार करून आम्ही मायलेकी हा आत्मघाताचा निर्णय घेत आहोत', अशी वेदना एका कागदावर उतरवून एका महिलेने तिच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या केली. नागपुरात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार नगरात आज रविवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली.

ठळक मुद्देहुडकेश्वर परिसरात करुणाजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'जगण्याची लढाई आम्ही हरलो. खूप प्रयत्न केले. मात्र, आता सहन होत नाही. त्यामुळे खूप विचार करून आम्ही मायलेकी हा आत्मघाताचा निर्णय घेत आहोत', अशी वेदना एका कागदावर उतरवून एका महिलेने तिच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार नगरात आज रविवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.उत्प्रेक्षा राजरतन मेश्राम (वय ३९) आणि रूपल राजरतन मेश्राम (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या मायलेकीची नावे आहेत.बेसा मार्गावरील अलंकार नगरात राजरतन मेश्राम यांचे घर आहे. ते इंडोरामा कंपनीत कामाला आहे. पत्नी उत्प्रेक्षा, मुलगा राजू (वय १९) आणि मुलगी रूपल, असे हे कुटुंब!दोन वर्षांपूर्वी त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. उत्प्रेक्षा वारंवार आजारी पडू लागल्या. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना दुर्धर आजार जडल्याचे उघड झाले. त्यामुळे अवघे कुटुंब हादरले. कसाबसा धीर धरत औषधोपचाराच्या आधाराने जगत असणाऱ्या उत्प्रेक्षा यांना काही महिन्यांपूर्वी तोंडात एक फोड आला. तो वाढत गेला आणि अल्सर असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे उत्प्रेक्षा आणखीनच खचली. अशा अवस्थेत वेदनांचे ओझे घेऊन जगणाऱ्या उत्प्रेक्षाने पतीसह आपल्या मुलांनाही वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिच्या असह्य वेदना तिला वारंवार अस्वस्थ करीत होत्या. काही दिवसांपूर्वी तिची मुलगी रूपल हिने दहावीची परीक्षा दिली. रूपल हिलासुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स, डाग येणे सुरू झाले. आधी चिकन फॉक्स असावे, असे वाटत होते. त्यामुळे तिच्यावरही उपचार सुरू झाले. घरात एकटाच कर्ता माणूस. त्यात त्यालाही व्यसन जडले आणि तुटपुंज्या पगारात या कुटुंबाचे जगणे कठीण होऊन बसले. तशात लॉकडाऊनचा तडाखा बसला अन हे कुटुंब कोलमडल्यासारखे झाले. आर्थिक, सामाजिक कोंडी. त्यात वेदनांचाही •ाार असह्य झाल्याने उत्प्रेक्षा काही दिवसांपासून प्रचंड बेचैन होती. ती मुलगी रुपलसोबत तिच्या वेदना शब्दाने वाटण्याचा प्रयत्न करायची. रुपलही तिला धीर देऊन दिवस ढकलायची. नेहमीप्रमाणे रविवारी ३ मे रोजी या कुटुंबातील चौघांनी दुपारचे जेवण घेतले आणि सर्वजण हॉलमध्ये बसले. मुलगा आणि वडील झोपल्याचे लक्षात आल्यानंतर उत्प्रेक्षा आणि रूपल उठल्या. त्या आतल्या खोलीत गेल्या त्यांनी ॲल्युमिनियमच्या शिडीवर चढून सिलींगच्या पंख्याला गळफास लावला. फासाचे एक टोक आईने तर दुसरे टोक मुलगी रूपलने आपल्या गळ्यात घातले. त्यानंतर दोघींनीही एक साथ सीडी वरून उडी घेतली. त्यांचा अखेरचा आवाज ऐकून बापलेक जागे झाले. त्यांनी मायलेकी फासावर लटकल्याचे पाहून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी गोळा झाले. हुडकेश्वर पोलिसांना माहिती कळताच ठाणेदार राजकमल वाघमारे आपल्या सहर्कायांसह तिकडे धावले. तोपर्यंत मेश्राम कुटुंबाच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी लागलीच दोघींना खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी घराची तपासणी केली असता रुपल आणि तिची आई उत्प्रेक्षा या दोघींनी कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे दिसले. मुलीकडून कागदावर आपल्या वेदना लिहून घेताना उत्प्रेक्षाने म्हटले की, मी जगण्यासाठी खूप धडपड केली. खूप संघर्ष केला. मात्र वेदनांपुढे हतबल ठरले. ही लढाई मी हरली. मुलीकडे बघून दिवस काढत होती. मात्र मुलीचीही अवस्था अशीच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिनेही माज्यासोबत आपले दुखणे कायमचे संपविण्याचे धाडस केले. आम्ही दोघी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आणि आत्महत्या करत आहो. आमच्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये, असे तिने पोलिसांना उद्देशून लिहून ठेवले आहे. आपल्या पतीला उद्देशून लिहिताना या चिठ्ठीत उत्प्रेक्षाने म्हटले की, मुलावर जास्त •ाार देऊ नका. त्याला एलआयसीचे काम करणे खूप जड जात आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या.सॉरी... बाय-बाय..असे या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

कुटुंब उद्ध्वस्तदरम्यान, उत्प्रेक्षा ने उचललेल्या आत्मघाती पावलामुळे तिचे कुटुंब अक्षरश: उध्वस्त झाले आहे त्यात मुलगा राजूची अवस्था फारच वाईट झाली आहे आई आणि बहीण अशा पद्धतीचे निघून गेल्याने त्याला काय करावे हेच सुचेनासे झाले आहे महत्त्वाचे म्हणजे उत्प्रेक्षा ला जी व्याधी होती तीच तिच्या पतीला असावी असा पोलिसांचा संशय आहे त्यामुळे आता निराधार झालेल्या या बापले कांची कसे होईल असा प्रश्न अनेकांच्या काळजात चिरे घालून गेला आहे.माय-लेकीच्या आत्महत्येच्या वृत्ताने अलंकार नगर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे

 

टॅग्स :Suicideआत्महत्या