शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नागपुरात सुरक्षेचे धडे देणारे ‘सिम्युलेटर’ धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:46 IST

अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नसल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रशासन सुरक्षेप्रति उदासीन असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून यंत्र बंद : सुरक्षेप्रति प्रशासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नसल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रशासन सुरक्षेप्रति उदासीन असल्याचे दिसून येते.एसटी महामंडळाने आपल्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयएए) या संस्थेच्या मदतीने १८ डिसेंबर २०१४ रोजी ‘सिम्युलेटर’ नागपुरात सुरू केले. ज्या चालकाच्या हातून अपघात झाला, त्या चालकांना ‘सिम्युलेटर’ द्वारे प्रशिक्षण देण्याची एसटी महामंडळाची योजना होती. वाहन चालविताना कुठे ब्रेक मारावा, कधी गेअर बदलावा, ओव्हरटेक करताना काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण ‘सिम्युलेटर’ या यंत्राद्वारे देण्यात येणार होते. परंतु विभागीय कार्यालयात एका कक्षात हे सिम्युलेटर बसविले तेव्हापासून धूळखात पडलेले आहे. नागपूर विभागात दरवर्षी जवळपास एसटी १०० अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदा नागपुरात ३० लाख रुपये किमतीचे ‘सिम्युलेटर’ बसविले. त्याचे उद्घाटनही नव्यानेच परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रयोग राज्यभरात सुरू करण्याची घोषणाही यावेळी रावते यांनी केली होती. परंतु उद्घाटनापासूनच हे यंत्र कुलूपबंद असल्यामुळे विभागातील एकाही चालकाला या यंत्राद्वारे प्रशिक्षण मिळू शकलेले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून हे ‘सिम्युलेटर’ का खरेदी करण्यात आले, असा सवाल एसटी महामंडळाच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले सिम्युलेटर सुरू करण्याची मागणी विभागातील कर्मचाºयांकडून होत आहे. बंद असलेल्या सिम्युलेटरबाबत एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.- सुरक्षेसाठी ‘सिम्युलेटर’ सुरू करणे गरजेचेएसटी महामंडळाचे अपघात टाळण्यासाठी ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने हे ‘सिम्युलेटर’ त्वरित दुरुस्त करून चालकांना वाहतुकीचे धडे देण्याची गरज आहे.शशिकांत वानखेडे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

टॅग्स :Nagpur Central Bus Standनागपूर मध्यवर्ती बसस्थानकnagpurनागपूर