शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 8, 2025 19:51 IST

सोमवार, ९ जून रोजी खुलत्या बाजारात चांदीचे भाव किती वाढतील, याकडे सराफांचे लक्ष लागले आहे.

- मोरेश्वर मानापुरे

नागपूर : गेल्या आठवड्यात प्रति किलो शुद्ध चांदीचे भाव ८,४०० रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने तेजीला पाठिंबा मिळाला आणि दरदिवशी चांदीचे भाव वाढून शनिवार, ७ जून रोजी १,०६,१०० रुपयांवर स्थिरावले.

सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपयांत विकली गेली. दुसरीकडे दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ६०० रुपयांनी वाढून जीएसटीविना ९६,२०० रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात २ जून रोजी चांदीचे भाव ३१ मेच्या तुलनेत २,६०० रुपयांनी वाढून जीएसटीविना १,००,३०० रुपयांवर पोहोचले. ३ जूनला १,६०० रुपयांची वाढ झाली. ४ जूनला मागणीअभावी भाव स्थिर होते.

५ जून रोजी चांदीच्या भावात तब्बल ४,२०० रुपयांची वाढ झाली आणि भावपातळी १,०६,१०० रुपयांवर पोहोचली. ६ जून रोजी भाव पुन्हा ४०० रुपयांनी वाढले. मात्र, शनिवार, ७ जून रोजी चांदी ४०० रुपयांनी घसरून १,०६,१०० रुपयांवर स्थिरावली. सोमवार, ९ जून रोजी खुलत्या बाजारात चांदीचे भाव किती वाढतील, याकडे सराफांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Silverचांदी