शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शुभम ढेपे खून प्रकरण : तीन आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:49 AM

सत्र न्यायालयाने गुरुवारी खून प्रकरणातील तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दीड लाख रुपये मयताच्या भावाला देण्याचा आदेश देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावलाअजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी खून प्रकरणातील तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील दीड लाख रुपये मयताच्या भावाला देण्याचा आदेश देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला.दिनेश ऊर्फ दादू शिशुपाल हजारे (१९), प्रीतम अंबादास कावळे (१९) व अमित प्रमोद सोमकुवर (१९) अशी आरोपींची नावे असून, हजारे रावणवाडी तर, अन्य दोन आरोपी कौसल्यानगर येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव शुभम नारायण ढेपे (२०) होते. तो रावणवाडी येथील रहिवासी होता. शुभमचे आरोपी दिनेश हजारेचा भाऊ ईशांतसोबत एका लग्नात भांडण झाले होते. ईशांतने त्याची माहिती दिनेशला दिली. त्यामुळे दिनेशने अन्य आरोपींसोबत मिळून शुभमचा खून करण्याचा कट रचला. २३ मार्च २०१५ रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास शुभम घरापुढे उभा होता. दरम्यान, आरोपींनी मोटरसायकलने तेथे जाऊन शुभमवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे शुभम जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यावर दगड टाकला. त्यामुळे शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.शुभमचा भाऊ पवन याने अजनी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावरून एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक एस. व्ही. पवार यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरु द्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयMurderखून