शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कलेच्या उपासिकेने तांदळावर साकारली श्रीगणेशाची १०८ नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:27 IST

कोटी कोटी रूप तुझे... या अभंगानुसार ३६ कोटी देवांमध्ये केवळ गणराज हे एकमेव दैवत आहे, ज्याची कित्येक नावे आणि कित्येक रूपे आहेत. त्यांच्या भक्ताला बाप्पा ज्या रूपात हवा आहे, तो त्या रूपात बाप्पाला घडवितो.

नागपूर, दि. 28 -  कोटी कोटी रूप तुझे... या अभंगानुसार ३६ कोटी देवांमध्ये केवळ गणराज हे एकमेव दैवत आहे, ज्याची कित्येक नावे आणि कित्येक रूपे आहेत. त्यांच्या भक्ताला बाप्पा ज्या रूपात हवा आहे, तो त्या रूपात बाप्पाला घडवितो. बाप्पाच्या रूपाबरोबर बाप्पाची नावेही भरपूर आहेत. कलेची उपासिका असलेल्या अंजली शाहू हिने आपल्या कलेद्वारे बाप्पाची रुपे अक्षरातून, अंकातून, रंगातून, नावातून शोधली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या १०८ नावांना तांदळाच्या दाण्यावर साकारले आहे.म्हाळगीनगरात राहणारी अंजली शाहू ही चित्रकलेची विद्यार्थिनी आहे. श्री गणेशाची निस्सीम भक्त असल्याने, ती आपल्या कलेच्या माध्यमातून दरवर्षीश्री गणेशाच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करते. यावर्षी अंजलीने गणरायाची १०८ नावे तांदळाच्या दाण्यावर कुंचल्याच्या माध्यमातून  रेखाटली आहे. कलेच्या क्षेत्रात अंजलीने साकारलेली कलाकृती अतिशय सूक्ष्म आहे.तितकेच बारकावे सुद्धा त्यात आहे. एकाग्रताही तेवढीच आवश्यक आहे. तांदळाच्या दाण्यावर एवढी बारीक कलाकृती तिने केवळ दोन दिवसांमध्येरेखाटली आहे. दरवर्षी अंजली आपल्या कल्पकतेतून श्रीगणेशाचा नाविन्यपूर्ण अविष्कार प्रकट करते. यापूर्वी तिने तांदळाच्या दाण्यावर अष्टविनायकाच्याप्रतिमा साकारल्या होत्या. सध्या ती पेन पेंटिंग या प्रकारातून अतिशय कलात्मक आणि दर्जेदार गणपतीच्या प्रतिमा कॅन्व्हॉसवर साकारत आहे. तिची हीकलाकृती तर रंगांच्या दुनियेत वावरणा-याबरोबरच, सर्वसामान्यांनाही भुरळ घालणारी आहे. अंजलीने सहा भाषेच्या मुळाक्षरांमधून तसेच १ ते १० अंकामधून सुद्धा गणरायाचा शोध घेतला आहे. अंजलीच्या कलेची नोंद इंडिया बुक आॅफ रिकॉर्ड, टॉप वन टष्ट्वेंटी टॅलेंट आॅफ इंडिया, एव्हरेज बुक आॅफरिकॉर्डने घेतली आहे. भूवनेश्वरमध्ये झालेल्या पेंटिंग प्रदर्शनात तिच्या गणपतीच्या कलाकृतीची दखल घेतली गेली आहे. अंजली आपल्या कलाकृतीची नोंदगिनीज बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्नरत आहे. 

- ३६ कोटी देवांगणात गणपती हे असे दैवत आहे, जे कुठल्याही आकारात रूपात घडविता येते. त्यामुळे कलावंतांसाठी गणपती हे अतिशय प्रिय दैवत आहे. कलावंताची त्याच्यावर श्रद्धा असले, तर त्याला फार अवघड जात नाही.- अंजली शाहू, चित्रकार

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव