शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चामुंडी स्फोटातील जखमी मरस्कोल्हे पाठोपाठ श्रद्धा पाटीलचाही मृत्यू; तिसऱ्या दिवशीही धामना गाव शोकातच

By नरेश डोंगरे | Updated: June 15, 2024 21:19 IST

मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

नरेश डोंगरे धामना, नागपूर : तब्बल ४८ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर श्रद्धा वनराज पाटील (वय २२) या तरुणीने काळापुढे हात टेकले. डॉक्टरांनी तिला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मृत घोषित केले. तिच्या मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत गुरूवारी, १३ जूनला दुपारी भीषण स्फोट झाल्यामुळे प्रांजली किसनाजी मोंदरे (वय २२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५) आणि शीतल आशिष चटप (३०) या पाच तसेच पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी) अशा सहा जणांचा करूण अंत झाला. तर दानसा मरस्कोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश), श्रद्धा वनराज पाटील (२२, रा. धामना) आणि प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) या तिघांवर रवीनगर चाैकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही शरीरात अत्यंत गंभीर जखमा असल्याने दानसा मरस्कोल्हे याने शुक्रवारी रात्री तर श्रद्धा वनकर हिने शनिवारी दुपारी प्राण सोडला.तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम अन्...

विशेष म्हणजे, प्रांजली, वैशाली, प्राची, मोनाली आणि शीतल या पाच जणींवर शुक्रवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाची पूजा आणि कार्यक्रम आज धामना गावात सुरू होता. तेवढ्यात श्रद्धा वनकरच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकले अन् गावावरची शोककळा अधिकच गडद झाली. भावविवश गावकऱ्यांनी श्रद्धावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त धामना गावात आणि कंपनी परिसरात लावण्यात आला आहे.प्रमोदची प्रकृती चिंताजनक

या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद चवारे (वय २५, रा. नेरी) या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात असल्याचे डॉ. पिनाक दंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, दानसा मरस्कोल्हे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी रात्रीच त्याच्या मध्य प्रदेशातील गावाकडे रवाना करण्यात आला. यावेळी त्याचे आई-वडील आणि नात्यातील एक तरुण सोबत होता, असेही डॉ. दंदे यांनी सांगितले.