शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:40 IST

तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील आणि कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून चेंबरला तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील आणि कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून चेंबरला तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत झलके यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चेदरम्यान झलके म्हणाले, डिप्टी सिग्नलमध्ये अनेक महिन्यापासून अपूर्ण सिमेंट रोड प्रकरणातील कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्याला गेल्या बैठकीत उत्तर मागितले होते. त्यानंतरही ही बाब अभि इंजिनिअरिंग व कार्यकारी अभियंत्याने गांभीर्याने घेतली नाही. आठ दिवसाच्या आत संबंधित सिमेंट रोडचे काम करण्याचे निर्देश दिले होते. नंदग्राम योजनेसंदर्भात नगररचना विभागाने अहवाल दिला आहे. संबंधित प्रकल्पाला गती प्रदान करण्यासाठी प्रस्तावित स्थळाचे मार्किंग सुरू करावे आणि त्यामुळे शहरातील गोठे शिफ्ट करणे शक्य होईल.झलके म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासकडून ले-आऊटचे हस्तांतरण अजूनही झालेले नाही. ५७२ आणि १९०० ले-आऊटमध्ये विकास कामे प्रलंबित आहेत. त्याच्या विकासासाठी शासनाकडून विशेष अनुदानाची मागणी केली, परंतु निधी मिळालेला नाही. हस्तांतरण प्रक्रियेची माहिती सादर करून प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वित्तीय स्थितीची माहिती दरमहा स्थायी समितीला सादर करण्यास सांगितले आहे.निधीच्या कमतरतेचा उल्लेख कराझलके म्हणाले, कोणत्याही फाईलला निधीच्या कमतरतेच्या कारणाने थांबविण्यात येत असेल तर तसा उल्लेख फाईलमध्ये करणे आवश्यक आहे. आयुक्तांच्या निर्देशावर पावले उचलली जात असेल तर त्याकरिता अधीक्षक अभियंत्याला संबंधित निर्देशाचा फाईलवर उल्लेख करणे गरजेचे आहे. असे न केल्यास अनुशासनात्मक कारवाई वा एफआयआरसुद्धा केला जाऊ शकतो.अग्निशमनच्या जुन्या गाड्या घेण्यास इन्कारअग्निशमन विभागाच्या जुन्या गाड्या, मशिनरी, उपकरणे आदींच्या विक्रीसाठी ई-लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. जुनैद आॅटो डिस्पोजलने सर्वाधिक बोली लावली होती. पण कोविड-१९ संक्रमणाचा हवाला देत निविदाकाराने बोलीतून हटण्याची परवानगी मागितली. स्थायी समितीने संबंधित बोली रद्द करण्यास मंजुरी प्रदान केली. याचप्रकारे नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर रस्ते रुंदीकरणाच्या एका प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका