शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.काणे यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काणे आणि त्यांची मुलगी शिवानी काणे यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश देत उत्तर सादर करण्यास म्हटले आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाने बजावली नोटीस : डॉ. काणेंनी केली होती मुलीला मदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काणे आणि त्यांची मुलगी शिवानी काणे यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश देत उत्तर सादर करण्यास म्हटले आहे.कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काणे परीक्षा नियंत्रक असताना आपली मुलगी शिवानी सिध्दार्थ विनायक काणे हिला परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेली मदत संपूर्ण परीक्षेत केलेल्या गैरव्यवहाराची रीतसर तक्रार विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे केली होती. पोलिसांनी १९ जानेवारी रोजी डॉ. काणे यांना पत्र पाठवून सीआरपीसी कलम ९१ प्रमाणे कागदपत्रांची मागणी केली. परंतु काणे यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे सुनील मिश्रा यांनी नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. हायकोर्टाने सीआरपीसी कलम १५६ प्रमाणे कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी मुभा दिली. तसेच कनिष्ठ न्यायालयाने वरील याचिका लवकर निकालात काढावी असे आदेश दिलेत. मिश्रा यांनी कनिष्ठ न्यायालयात ( मिसलेनियस क्रिमिनल अप्लिकेशन नंबर १५२०/२०१८) नुसार पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. हायकोर्टाने आपणास राज्यपालांनी न्यायलयात तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली नाही आणि आपण पुरावे सादर केले नाही. त्यामुळे आपला अर्ज खारीज करण्यात येत आहे, असे निर्णय देताना म्हटले होते. मिश्रा यांनी या आदेशाला जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. पोलीस जोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत पुरावे मिळणार नाही. कारण संपूर्ण दस्तावेजांचे संरक्षक स्वत: कुलगुरु आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक प्रकरणांचा दाखला त्यांनी दिला. सत्र न्यायालयाने डॉ. काणे आणि शिवानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना २२ मे रोजी हजर राहून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर