शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व उपकरणांची दुकाने सुरू करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 00:30 IST

कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व इतर उपकरणांची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी नागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

ठळक मुद्देनागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनचे मनपा आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व इतर उपकरणांची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी नागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.असोसिएशनचे अध्यक्ष ए.के. गांधी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू करून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपुरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वाधिक दुकाने आहेत. या सर्व दुकान आणि शोरूमच्या संचालकांना आर्थिक फटका बसत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीस तापमान ४८ डिग्रीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरात परिस्थिती असह्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात एअर कंडिशनर्स आणि एअर कुलरची जास्त आवश्यकता आहे. मुंबई आणि पुणे वा राज्यातील इतर शहरांपेक्षा नागपुरात या वस्तूंची जीवनाश्यक वस्तूंप्रमाणेच जास्त आवश्यकता आहे. लॉकडाऊनंतर दुकाने आणि शोरूम बंद झाल्याने या वस्तूंची खरेदी थांबली आहे. दुकाने सुरू केल्यास गरमीच्या दिवसात लोकांची गरज पूर्ण होणार आहे.नागपूरची लोकसंख्या ३५ लाखांच्या आसपास आहे. मुंबई आणि पुणेनंतर राज्यांच्या इतर शहरांच्या तुलनेत नागपूरची लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतरही प्रशासनानने सकारात्मक पावले उचलल्याने नागपुरात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३०० च्या आसपास आहे. ही नागपूरसाठी चांगली बाब आहे. अनेक गोष्टी नियंत्रणात आहेत.वाढत्या गरमीत रहिवाशांना एअर कुलर आणि एअर कंडिशनर्स खरेदी करण्यासाठी शोरूम सुरू करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेने ३ मे पासून ठरलेल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन, संगणक, वाहन व हार्डवेअर व प्लम्बिंग स्टोअर्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अशाच प्रकारे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी तसेच डीलर असोसिएशन सर्व सुरक्षा उपाय व निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करेल, असे असोसिएशनचे अध्यक्ष ए.के. गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर