शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ट्रक चालकाची केबिनला लटकून आत्महत्या; १६० तेलाचे बॉक्स चोरी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:10 IST

Nagpur News सोयाबीन तेलाचे बॉक्सेस घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी गेल्यानंतर या ट्रकच्या चालकाने केबिनला तारेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सोयाबीन तेलाचे बॉक्सेस घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकमधील १६० बॉक्स चोरी गेल्यानंतर या ट्रकच्या चालकाने केबिनला तारेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अशोक जितूलाल नागोत्रा असे या चालकाचे नाव आहे.काय आहे नेमकी घटना?सोयाबीन तेलाची खोकी घेऊन ९ जून रोजी सावनेरहून ट्रक क्र. एम.एच. ०४-जी.आर.२७७४ मुंबईकडे रवाना झाला होता. कामठी येथील रहिवासी असलेला ड्रायव्हर अशोक जितूलाल नागोत्रा (२५) हा एकटाच ट्रक चालवीत होता. रात्री १२.३० च्या सुमारास अमरावती मार्गावरील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारगाव येथील भारत पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून झाल्यावर तो केबिनमध्ये झोपी गेला. १० जूनला सकाळी सातच्या सुमारास तो उठला तेव्हा, ट्रकची ताडपत्री कापून १६० तेलाचे बॉक्सेस पळवल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरी गेलेल्या बॉक्सेसची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार आहे. ट्रकमध्ये १७०० बॉक्सेस होते. या प्रत्येक बॉक्सची किंमत २३०० रु. आहे. चोरीच्या या घटनेची तक्रार कोंढाळी पोलिस ठाण्यात करण्यात आली. कोंढाळीचे ठाणेदार प्रफुल्ल फुल्लरवार यांनी चौकशी केली असता, संबंधित पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता.

दरम्यान अशोक नागोत्रा याच्याविरुद्ध १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या ट्रकमधील मालाचे मोजमाप करायचे असल्याकारणाने हा ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारातच उभा होता.

मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा या चालकाचा मृतदेह या ट्रकच्या केबिनबाहेर गळफास अडकलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. या घटनेची माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आली आहे. अशोकचा मृतदेह नागपूरला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.