शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नागपुरात नऊ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:25 IST

नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शेजारच्या आरोपीने पाशवी बलात्कार केला. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देशेजारणीने केला विश्वासघातसोनेगाव ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शेजारच्या आरोपीने पाशवी बलात्कार केला. शेजारच्या एका महिलेने पीडित महिलेचा विश्वासघात करून आपल्या घरात बोलविले आणि आरोपीला बलात्कार करण्यासाठी मदत केली. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याची मदत करणाऱ्या महिलेची चौकशी सुरू आहे.सोनेगाव वस्तीशेजारी असलेल्या सहकारनगरातील रेल्वेच्या खाली जागेत एक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत आरोपी छोटू ऊर्फ मद्रासी मेश्राम (वय ४२) राहतो. बाजूलाच मीराबाई (वय ५६) नामक आरोपी महिला राहते. ती आणि आरोपी मद्रासी मेश्राम या दोघांमध्ये मैत्री आहे. ते मातीगोट्याचे काम करतात. रात्री एकत्र बसून दारू पितात. महिनाभरापूर्वी कळमेश्वरहून रोजगाराच्या शोधात आलेले एक दाम्पत्य या झोपडपट्टीत राहायला आले. पीडित महिला (वय २०) नू महिन्यांची गर्भवती आहे. तिचा पती रंगरंगोटीचे काम करतो. शनिवारी सकाळी तो कामावर निघून गेला. दुपारी २.३० वाजता गर्भवती महिला झोपड्यात एकटी असल्याचे पाहून आरोपी महिला मीराबाईने तिला आपल्या घरात बोलविले. तिच्याशी औपचारिक चर्चा करीत असतानाच आरोपी मद्रासी मेश्राम झोपड्यात आला. त्यानंतर मीराबाई बाथरूमला जाते, असे सांगून घराबाहेर आली आणि तिने आपल्या झोपड्याचे दार बाहेरून लावून घेतले. आरोपी मद्रासी मेश्रामने गर्भवती महिलेवर बलात्कार केला. तो तिकडे कुकृत्य करीत असतानाच महिलेचा पती दुपारच्या जेवणासाठी कामावरून घरी परतला. पत्नी घरी नसल्याचे पाहून तो मीराबाईच्या झोपड्याकडे आला. तो दाराच्या फटीतून डोकावून पाहू शकतो, हे ध्यानात आल्याने बाजूला लपून बसलेल्या मीराबाईने त्याला मागून दगड फेकून मारला. डोक्याला दगड लागल्याने तो किंचाळला तर, पतीचा आवाज आल्याने आतमध्ये मद्रासीच्या तावडीत असलेल्या महिलेनेही मदतीसाठी आरडाओरड केली. पत्नी आतमध्ये असल्याचे लक्षात आल्यामुळे तिच्या पतीने मीराबाईच्या झोपड्याचे दार उघडले. तेव्हा आरोपी मद्रासी मेश्राम तेथून पळून गेला.पत्नीची अवस्था बघून पतीने शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मेश्रामला ताब्यात घेतले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मीराबाई मात्र पळून गेली. रविवारी सकाळी तिला पोलिसांनी शोधले. वृत्त लिहिस्तोवर तिची चौकशी सुरू होती.

परिसरात संतापया घटनेची वार्ता कळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येत नागरिक झोपडपट्टीत जमा झाले. काहींनी मीराबाईच्या झोपड्याला तोडण्याचीही भाषा वापरली. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. वेळीच पोलीस पोहोचल्याने अप्रिय घटना टळली.

टॅग्स :Rapeबलात्कार