शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाच वर्षांत चार लाख झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:55 IST

वनखात्याच्या नागपूर विभागांतर्गत २०१५ सालापासून थोड्याथोडक्या नव्हे तर चार लाखांहून अधिक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देबेकायदेशीरपणे तोडली झाडेपरवानगी घेऊन कापली ६४ लाख झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे झाडे लावण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध मोहिमा राबविण्यात येत असल्या तरी वृक्षांची बेकायदेशीरपणे होणारी कत्तल थांबविण्यात यश आलेले नाही. वनखात्याच्या नागपूर विभागांतर्गत २०१५ सालापासून थोड्याथोडक्या नव्हे तर चार लाखांहून अधिक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली. याच कालावधीत वनविभागाची परवानगी घेऊन ६४ लाखांहून अधिक झाडे कापण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत वनखात्याच्या नागपूर कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१५ पासून परवानगी घेऊन किती झाडे पाडण्यात आली, किती झाडे बेकायदेशीरपणे पाडण्यात आली, त्यात सागवानाच्या झाडांची संख्या किती होती इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. वनविभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ४ लाख ३३५ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली. या झाडांची किंमत २६ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे. तर एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या कालावधीत नागपूर विभागात वनखात्याची परवानगी घेऊन ६४ लाख ४२ हजार ४०१ झाडे तोडण्यात आली. एकूण ६९ हजार ४१२ प्रकरणांत ही परवानगी घेण्यात आली होती.सागवानच ‘टार्गेट’वृक्षतोडीमध्ये सर्वात जास्त प्रमाण सागवानाच्या झाडांचेच असल्याची बाब समोर आली आहे. १ जानेवारी २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत बेकायदेशीरपणे सागवानाची १ लाख ७३ हजार ९४१ झाडे तोडण्यात आली. त्यांची किंमत १९ कोटी ३० लाख इतकी होती. एकूण तोडलेल्या झाडांच्या तुलनेत सागवानाच्या झाडांची टक्केवारी ही ४३.४५ टक्के इतकी होती तर १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत परवानगी घेऊन सागवानाची तब्बल ४३ लाख ६६ हजार ७३० झाडे तोडण्यात आली. एकूण झाडांच्या तुलनेत यांची टक्केवारी ही ६७.७८ टक्के इतकी ठरली.

टॅग्स :environmentपर्यावरण