शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेला अर्धवस्त्र करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:58 IST

२० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देशेतीचा ताबा घेण्यावरून उद्भवला वादवाकेश्वर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची अगतिकता लक्षात घेत व्याजाने रक्कम द्यायची. पाहिजे तिथे अंगठे आणि स्वाक्षरी घेत, नंतर शेती हडपायची हा गोरखधंदा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. गत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारातून एका शेतकºयाने आत्महत्याही केली. त्यानंतर आता पुन्हा या गोरखधंद्याने तोंड वर काढले आहे. चक्क विक्रीपत्र दाखवीत शेतीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अवैध सावकाराने आपल्या पत्नीच्या हाताने पुरुषांच्या घोळक्यात शेतकरी महिलेला धक्काबुक्की करीत मारहाण केली.दामिनी (काल्पनिक नाव) असे पीडित शेतकरी महिलेचे नाव आहे. व्याजाचे पैसे, शेतीचे विक्रीपत्र आणि ताबा मिळविण्यासाठी अवैध सावकाराचा खटाटोप यातूनच ही निर्लज्जपणाचा कळस गाठणारी घटना घडली. दामिनीने दिलेल्या माहितीनुसार २० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याप्रकाराला दामिनी व तिच्या पतीने विरोध केला. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. उदरनिवार्हाचे साधन हिसकले जात असल्याने दामिनीने शेतात फिरत असलेला अवैध सावकाराचा ट्रॅक्टर रोखण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान सावकाराच्या पत्नीने दामिनीला साडी खेचून अक्षरश: बेअब्रू केले. हा प्रकार सुरू असताना अवैध सावकारासह ट्रॅक्टरचालक व अन्य ५-६ पुरुष शेतात उपस्थित होते. मात्र दामिनीच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. हा सर्वप्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.बेअब्रूचाही व्हिडिओदामिनीची बेअब्रू होत असताना त्या सावकाराने कॅमेरामनच्या माध्यमातून छायाचित्र व व्हिडिओसुद्धा तयार केला, असा गंभीर आरोप दामिनीच्या पतीने केला आहे. तसा व्हिडिओसुद्धा लोकमतच्या हाती लागला आहे. यात शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की, हातात लाठ्या आणि दामिनीला बेअब्रू करण्याचा अक्षरश: निर्लज्ज प्रकार कैद झाला आहे.असे आहे प्रकरणदामिनीच्या पतीच्या नावे तालुक्यातील वाकेश्वर येथे एक हेक्टर शेती आहे. नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेल्या दामिनीच्या पतीने तीन वर्षांपूर्वी उमरेड येथील अवैध सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतली होती. व्याजाची वाढती रक्कम देण्यासाठी त्यांनी अनेकदा सावकाराचे उंबरठे झिजविले. मात्र सावकाराने त्यास नकार दिला. अद्यापही पीडित शेतकरीच शेताची वाहीजुपी करीत आहे. अशात गत २० जून रोजी सावकार व त्याच्या पत्नीने दामिनीच्या शेतात दाखल होत, ताबा मिळविण्यासाठी उपद्व्याप केला. यावेळी सावकाराच्या पत्नीच्या नावे आपल्या शेताचे विक्रीपत्र पाहून दामिनीला धक्का बसला. याप्रकरणी १५ जून रोजी दामिनीने पोलिसात तक्रारही नोंदविली आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग