शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

नागपुरातील अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा : चार कंडक्टरचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:09 IST

महापालिकेच्या स्टार बसच्या चार कंडक्टरनी सात महिने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. मानकापूर पोलिसांनी स्टार बसच्या चारही कंडक्टरला अटक केली आहे.

ठळक मुद्देचौघेही आरोपी स्टार बसचे कर्मचारी, मानकापूर पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्टार बसच्या चार कंडक्टरनी सात महिने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. मानकापूर पोलिसांनी स्टार बसच्या चारही कंडक्टरला अटक केली आहे.आशिष काशिनाथ लोखंडे (२५) रा. पूजा रेसिडेन्सी, कोराडी मार्ग, उमेश ऊर्फ वर्षपाल मोरेश्वर मेश्राम (२२), धर्मपाल दादाराव मेश्राम (२२) आणि शैलेश ईश्वर वंजारी (३१) रा. पारडी अशी अटक करण्यात आलेल्या स्टारबस कंडक्टरची नावे आहेत. आरोपी मूळचे पारशिवनीच्या इटगावचे रहिवासी आहेत. ते स्टार बसमध्ये कंडक्टर आहेत. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन ११ वीची विद्यार्थिनी आहे. ती सीताबर्डीच्या एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकते. ती स्टारबसने महाविद्यालयात ये-जा करते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिची जुलै २०१८ मध्ये स्टार बसचा कंडक्टर धर्मपाल मेश्रामशी ओळख झाली. धर्मपालने आपली ओळख लपविण्यासाठी आपले नाव अतुल असे सांगितले. दोघांनीही एकमेकांना आपला मोबाईल क्रमांक दिला. धर्मपाल विद्यार्थिनीला कोराडी मार्गावरील अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलजवळील पूजा रेसिडेन्सीमध्ये आशिष लोखंडे याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. आशिषने हा फ्लॅट किरायाने घेतला आहे. धर्मपालने आशिषच्या फ्लॅटवर या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. जवळपास महिनाभर धर्मपालने अनेकदा तिच्यावर या फ्लॅटमध्ये अत्याचार केला. ऑगस्ट महिन्यात शैलेश वंजारीने या विद्यार्थिनीला फोन करून तू अतुलला ओळखते काय असे विचारले. तिने ओळखत असल्याचे सांगितल्यावर त्याने तिला सीताबर्डीत भेटण्यासाठी बोलावले. शैलेशही तिला पूजा रेसिडेन्सी येथे घेऊन गेला. तेथे त्याने धर्मपालला बोलावले. दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. दिवाळी असल्यामुळे विद्यार्थिनीचे महाविद्यालयात येणे कमी झाले. दरम्यान आशिषने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. त्यानेही तिला भेटण्यासाठी सीताबर्डीत बोलावून त्या फ्लॅटवर नेले. आशिषने धर्मपाल, शैलेशलाही फ्लॅटवर बोलावले. तेथे तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर उमेश या विद्यार्थिनीच्या संपर्कात आला. त्याच्या आधी विद्यार्थिनी धर्मपाल, आशिष आणि शैलेशच्या शोषणाला बळी पडली होती. विद्यार्थिनीने उमेशपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार उमेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तो तिला कन्हान येथील आपल्या भावजीच्या घरी नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मेडिकल चौक येथे राहणाऱ्या गर्लफ्रेंडच्या घरी नेले. तेथेही तिच्यावर अत्याचार केला.सात महिने आरोपींच्या अत्याचाराला बळी पडल्यानंतर विद्यार्थिनीला आपण गर्भवती असल्याची शंका आली. तिचे आईवडील मजुरी करतात. बदनामीच्या भीतीने ती २८ फेब्रुवारीला घरून निघून गेली. कुटुंबीयांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात पोलिसांना ही विद्यार्थिनी रायपूरला असल्याचे समजले. यशोधरानगर पोलिसांनी विद्यार्थिनीला रायपूरवरून नागपूरला आणले. तिची चौकशी केली असता तिने नागपूरवरून डोंगरगडला गेल्याचे सांगितले. डोंगरगडमध्ये एका युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. घरून पळून जाण्याचे कारण विचारले असता तिने स्टार बसच्या कंडक्टरने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा आणि बाल अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. घटनास्थळ कोराडी मार्गावरील असल्यामुळे हे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे पाठविण्यात आले.आरोपींना नोकरीवरून काढलेघटनेमुळे स्टार बसच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. स्टार बसमध्ये दररोज शेकडो विद्यार्थिनी प्रवास करतात. चारही कंडक्टर ज्या पद्धतीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे शोष करीत होते तो चिंतेचा विषय आहे. यापूर्वीही स्टार बसच्या कर्मचाऱ्याने महिला प्रवाशांसोबत अभद्र व्यवहार केल्याच्या घटना घडल्या आहेत. स्टार बसचे संचालन महापालिका करते. या घटनेला परिवहन समितीने गांभीर्याने घेऊन आरोपी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटविले आहे. परिवहन समितीचे सभापती बंटी शेळके यांच्या मते महिला प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. गुन्ह्यातील आरोपींसाठी महापालिकेत कोणतेच स्थान नाही. कुकडे यांनी स्टार बस कर्मचाºयांशी संबंधित कोणतीही समस्या किंवा तक्रार असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.तो फ्लॅट पोलीस अधिकाऱ्याचासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक अत्याचार करण्यात आलेला फ्लॅट एका पोलीस अधिकाºयाचा आहे. हा अधिकारी नांदेडमध्ये नोकरीवर आहे. आशिष दोन वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये राहतो. वर्षभरापूर्वी तो या अधिकाऱ्याच्या फ्लॅटमध्ये राहावयास आला. पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही चौकशी न करता फ्लॅट किरायाने दिल्याची माहिती आहे. मानकापूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार