शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ‘लेफ्टनंट कर्नल’ पतीकडून सैन्यातील अधिकारी पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 22:22 IST

Nagpur News डॉक्टर, अभियंता, अधिकारी महिलांची प्रकरणे समोर असताना चक्क सैन्यात अधिकारी असलेल्या महिलेलादेखील याचा सामना करावा लागला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मोठ्या पदावर असलेल्या संबंधित महिलेचा छळ करणारा पतीदेखील सैन्यातच ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर कार्यरत आहे.

नागपूर : महिला सक्षमीकरणाचे अनेक दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेकदा उच्चशिक्षित कुटुंबांमध्येदेखील घरगुती हिंसाचाराची प्रकरणे दिसून येतात. डॉक्टर, अभियंता, अधिकारी महिलांची प्रकरणे समोर असताना चक्क सैन्यात अधिकारी असलेल्या महिलेलादेखील याचा सामना करावा लागला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मोठ्या पदावर असलेल्या संबंधित महिलेचा छळ करणारा पतीदेखील सैन्यातच ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर कार्यरत आहे. अनेक वर्ष छळ सहन केल्यानंतर पाणी नाकाच्या वर गेल्याने अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली व पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणामुळे सैन्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. दोघेही पती-पत्नी सैन्यात अधिकारीपदावर असून सात ते आठ वर्षांअगोदर दोघांचे लग्न झाले. महिला नागपूर जिल्ह्यात कार्यरत असून पतीची ‘पोस्टिंग’ पश्चिम बंगालमध्ये आहे. सुरुवातीपासूनच दोघेही वेगवेगळ्या जागांवर कार्यरत असल्याने तीन महिन्यांतून एकदा भेटायचे. २०१७ मध्ये दोघांचीही ‘पोस्टिंग’ उत्तरप्रदेशमध्ये झाली व त्यानंतर छळवणूकीचा प्रकार सुरू झाला. लहान लहान गोष्टींवर पती पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायचा. पत्नी सैन्यात अधिकारी असली तरी बदनामी नको म्हणून ती छळ सहन करत होती. बाळ झाल्यावरदेखीळ पतीत सुधारणा झाली नाही व अगदी महिलेच्या आईवडिलांसमोर तिला दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली. अगदी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्यापर्यंतदेखील त्याची मजल गेली होती.

प्रत्येकवेळी पती तिला मारहाण करायचा व दुसऱ्या दिवशी माफी मागून नामानिराळा व्हायचा. बाळाच्या भवितव्यासाठी पत्नीदेखील मौन बाळगून होती. अधिकारी महिलेची नागपूर जिल्ह्यात बदली झाली, तर पतीची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये होती. काही आठवड्यांअगोदर तिचा पती तिला व मुलीला भेटायला आला होता. तो जबरदस्तीने बाळाला फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र महिलेने विरोध केला असता तिला सार्वजनिक जागेवरच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व तिचा मोबाईलदेखील फोडला. या प्रकारामुळे महिला दहशतीत होती. मात्र अखेर तिने हिंमत जुटवली व जुनी कामठी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीसदेखील हे प्रकरण ऐकून आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी ‘लेफ्टनंट कर्नल’ असलेल्या पतीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी