शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : राज्यात ६९ टक्के शाळेत मुख्याध्यापक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:24 IST

डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देचाईल्ड राईट अलायन्स आणि अपेक्षा होमिओ सोसायटीची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.चाईल्ड राईट अलायन्स आणि अपेक्षा होमिओ सोसायटी यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या अहवालानुसार राज्यात १ ते ८ वर्गाच्या ९७०८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. तरीही राज्यातील ४६ हजार शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही शाळा एक शिक्षकी असू नये, असा नियम आहे. मात्र राज्यात ३५३४ शाळा एकशिक्षकी आहे. ४२४०७ शाळा दोन शिक्षकी आहे. ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. महाराष्ट्रात कमी पटसंख्येच्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१७ मध्ये घेतला होता. याला संघटनांनी विरोध केल्याने निम्म्या शाळा वाचल्या. तरीही ५६८ शाळा स्थलांतराच्या नावावर बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती चाईल्ड राईट अलायन्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार व अपेक्षा होमिओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुंबळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

टॅग्स :SchoolशाळाTeachers Recruitmentशिक्षकभरती