शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे ऑईनमेंट देणाऱ्या ‘मेडिकल स्टोअर’ला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:36 IST

महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश.

ठळक मुद्देमहिलेचा चेहरा विद्रूप १ लाख १५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला ग्राहकास चेहऱ्यावर लावायला चुकीचे ऑईनमेंट दिल्यामुळे मौदा तालुक्यातील तारसा येथील सौरभ मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार मंचने जोरदार दणका दिला आहे. ग्राहकास १ लाख १५ हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मेडिकलला देण्यात आला आहे.पल्लवी झाडे असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या धानला, ता. मौदा येथील रहिवासी आहेत. सौरभ मेडिकलने दिलेल्या चुकीच्या ऑईनमेंटमुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला आहे. मंचने त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १ लाख, उपचारावरील खर्चापोटी ५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. सौरभ मेडिकलला या आदेशाचे पालन करण्यासाठी ३० दिवासाची मुदत देण्यात आली आहे. अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला.तक्रारीतील माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०१५ रोजी झाडे यांना रामटेक येथील डॉ. पौर्णिमा लोधी यांनी चेहऱ्यावर लावण्यासाठी ‘अ‍ॅलॉईडर्म’ ऑईनमेंट लिहून दिले होते. ते ऑईनमेंट खरेदी करण्यासाठी त्या सौरभ मेडिकलमध्ये गेल्या असता त्यांना ‘अ‍ॅलॉईडर्म’ ऐवजी ‘डेरोबिन’ ऑईनमेंट देण्यात आले. झाडे यांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांना दोन्ही ऑईनमेंटमधील कन्टेन्टस् सारखे असून केवळ कंपन्या वेगळ्या आहेत व त्यामुळे काहीच फरक पडणार नाही असे सांगण्यात आले. तसेच, झाडे यांना पक्के बिल देण्यात आले. परंतु, ‘डेरोबिन’ ऑईनमेंट लावल्यानंतर झाडे यांच्या चेहऱ्यावर लालसर डाग पडले व त्यांचा चेहरा काळा झाला. त्यानंतर त्यांनी भंडारा येथील डॉ. विनय रहांगडाले यांच्याकडे तपासणी केली असता ‘डेरोबिन’ ऑईनमेंटमुळे रिअ‍ॅक्शन झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. परिणामी, त्यांनी भरपाईसाठी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने नोटीस बजावल्यानंतर सौरभ मेडिकलने उत्तर दाखल करून झाडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय दिला.

हा तर बेजबाबदारपणाग्राहकांना औषधे देताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. परंतु, सौरभ मेडिकलने बेजबाबदार व निष्काळजीपणाची कृती केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध होते. तसेच, त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचाही अवलंब केला आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदविले.

टॅग्स :consumerग्राहक