शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज सिंग चौहान संघ मुख्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:03 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देसरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता व सायंकाळीच चौहान नागपुरात दाखल झाले होते. मध्य प्रदेशात पाच संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्यानंतर तेथील राजकारण तापले आहे. यावर्षी तेथे विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.सायंकाळी ७ वाजता चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी सुमारे २० मिनिटे त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. त्यानंतर सरसंघचालक मुख्यालयातून नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. भय्याजी जोशी यांच्यासमवेत चौहान यांची ८.३० वाजेपर्यंत चर्चा चालली. मध्यप्रदेशात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवराज सिंह हे गेल्या १५ वर्षांपासून तेथे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने चौहान यांनी सरकार्यवाहांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नागपुरातील संघ मुख्यालयात हजेरी लावल्याचे बोलले जाते. या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची अधिकृत माहिती कळू शकली नाही. चौहान यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

 

 

 

 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय