शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तीन खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:50 IST

राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देबुद्धिबळपटू दिव्या देशमुख, रौनक साधवानी, हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले.बुद्धिबळपटू दिव्या व रौनक यांची कामगिरी आश्चर्यचकित करणारी अशीच आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून दिव्या व रौनकने आॅरेंज सिटीची वेगळी ओळख निर्माण केली. दोघांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदांना गवसणी घातली. ‘वंडरगर्ल' दिव्याने वयाच्या सातव्या वर्षीच डब्ल्यूएफएम (वूमन फिडे मास्टर) हा नॉर्म पूर्ण केला होता. सर्वात कमी वयात हा नॉर्म पूर्ण करणारी दिव्या महाराष्ट्रातील पहिली बुद्धिबळपटू ठरली . आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) हे बुद्धिबळातील मानाचे स्थान प्राप्त करणाऱ्या रौनक साधवानीने अनेक राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्पर्धा गाजविल्या आहेत.रौनक सद्यस्थितीत लिच (आॅस्ट्रिया) येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. दोन्ही बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या बळावर त्यांची शिवछत्रपती पुरस्कारासाठी थेट निवड झाली . महिलांच्या राज्यस्तरीय व राष्टष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणारी प्रतिभावंत हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकरची सुद्धा छत्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त सीताराम भोतमांगे व सुनील भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात समीक्षा यशवंत स्टेडियम येथे नियमित सराव करते.पुरस्कारामुळे प्रेरणा मिळेल: दिव्या‘या पुरस्काराबद्दल मला माहीत नव्हते. परंतु, शासनाच्या सर्वात मोठ्या छत्रपती पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मला आनंद झाला. हा पुरस्कार इतक्या लवकर मिळेल अशी अपेक्षा नव्हती. वूमन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) हा नॉर्म कमी वयात पूर्ण केल्याबद्दल माझी निवड करण्यात आली. प्रत्येक पुरस्कार हा खेळाडूंसाठी महत्त्वाचा व प्रोत्साहित करणारा असतो. छत्रपती पुरस्कारामुळे मला प्रेरणा मिळेल व मी आणखी चांगली कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल. इंटरनॅशनल मास्टरचा दुसरा नॉर्म त्वरीत पूर्ण करणे, हेच माझे लक्ष्य असेल.’

ग्रॅण्डमास्टर बनणे हेच ध्येय: रौनक‘पुरस्कारामुळे मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बुद्धिबळ खेळात ग्रॅण्डमास्टर बनणे माझे ध्येय असून पुरस्कारामुळे ध्येय पूर्ण करण्यास मदतच मिळणार आहे. सध्या विदेशात स्पर्धा खेळत असल्यामुळे पुरस्कार स्वीकारणे शक्य नाही. त्यामुळे माझे वडील हा पुरस्कार स्वीकारतील.’

टॅग्स :Chessबुद्धीबळ