शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विदर्भातील सर्व जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:34 IST

एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देदिवाकर रावते : आयात उमेदवारांवर भाजपाची भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.विदर्भातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी रावते हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी भंडारा- गोंदिया व नागपूर अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याकडे लक्ष वेधले असता रावते म्हणाले, भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षातून माणसे घेऊन निवडणुका लढवायचे काम भाजप करीत आहे. आयातीवरच पक्ष चालणार असेल तर एक दिवस ते त्यांना चांगलेच महागात पडेल. लोकशाही व घटनेचा सन्मान करणाऱ्या पक्षाचा जनता सन्मान करते. हे कर्नाटकने दाखवून दिले आहे. शिवसेनेने भाजपाची साथ सोडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील, या रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. रामदास आठवले विनोद करतात, हे माहीत आहे. मात्र, ते एवढा राष्ट्रीय विनोद करतील हे माहीत नव्हते, अशा शब्दात त्यांनी आठवले यांची खिल्ली उडविली.एसटीच्या भाडेवाढीचे संकेत सातत्याने होत असलेल्या डिझेल भाववाढीमुळे एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत रावते यांनी दिले. ते म्हणाले, पूर्वी एखादवेळी इंधनवाढ होत होती. आता मात्र सातत्याने होत आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात डिझेल ५७ रुपये होते. आता १० रुपयांनी वाढले आहे. या वाढीमुळे एसटीला ४६० ते ४७० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागला आहे. याशिवाय एक लाख कामगारांची पगारवाढही तोंडावर आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्यास सरकार त्यावर निर्णय घेईल. मात्र, डिझेल दरवाढ पाहता भाडेवाढीची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.नोटा फाडणे हा देशद्रोहभाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी हातगाडी चालविणाऱ्याच्या जवळील नोटा घेऊन फाडल्या. यावर रावते म्हणाले, खासदाराने नोटा फाडणे यावर केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे प्रमुख काय मत देतात ते महत्त्वाचे आहे. नोटांवर देश चालतो, ही राष्ट्रीय मुद्रा आहे. त्यामुळे नोटा फाडणे हा राजद्रोह आहे का, असेल तर काय शिक्षा व्हावी, यावर विचार व्हावा. हा विषय सोमय्यांच्या निमित्ताने चर्चेला आला आहे. यामुळे लोक पुढे नोटांचा जपून वापर करतील. कुणी अवमान करणार नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDiwakar Raoteदिवाकर रावते