लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून आता तो ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष झाला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिवसेना हा ‘सेक्युलर’ पक्ष असता तर काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांच्या ‘सेक्युलर’वादामध्ये ढोंगीपणा आहे. भाजपाने मुस्लिमांचे मत मिळावे यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही. ‘सबका साथ-सबका विकास’मध्ये मुस्लिमदेखील येतात. मात्र शिवसेना आता मुस्लिमांच्या मतांसाठी व्होट बँकेचे राजकारण करत आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळेल. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते व आम्हाला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही पास होऊ. विधानपरिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसते. काही ना काही परिणाम नक्कीच होत असतो व तो आपल्याला पहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.