शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्याची एनटीपीसी अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 10:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र उत्तराने समाधान न झाल्याने एनटीपीसीच्या अधिकाऱ्याला खासदारांनी सभागृहाबाहेर काढले. तेवढ्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत मौदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गोडबोलेसह अन्य एकावर ...

ठळक मुद्देमौदा एसडीओ कार्यालयातील प्रकार देवेंद्र गोडबोलेसह अन्य एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र उत्तराने समाधान न झाल्याने एनटीपीसीच्या अधिकाऱ्याला खासदारांनी सभागृहाबाहेर काढले. तेवढ्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत मौदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गोडबोलेसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मौदा तालुक्यातील राजकीय वातावरण आता चिघळण्याची शक्यता आहे.एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर विचारविमर्श करून तोडगा काढण्यासाठी मौदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी आढावा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला खा. कृपाल तुमाने, उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे, एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमनलाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

दोन्ही आरोपी पसारया प्रकरणी राजकुमार प्रजापती यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही तपास अधिकारी सहायक पोलीस अधिकारी चंद्रशेखर मस्के यांनी व्यक्त केली. दोघांचाही शोध सुरू असल्याचे मस्के यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गोडबोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. या प्रकारामुळे आता मौदा तालुक्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेधएनटीपीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवसेना नेत्याने केलेल्या मारहाणीचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन करू, असा इशारा कर्मचाऱ्यांसह कामगारांनी दिला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांनी काम करावे तर कसे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत एनटीपीसी आॅफिसर्स असोसिएशन व एनटीपीसी वर्कर्स युनियनने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सोपविले. प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी एनटीपीसी खंबीरपणे उभे असल्याचे एनटीपीसीने कळविले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना