शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

२६/११ चा तपास करणारे शेंगळे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:57 IST

स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला,...

ठळक मुद्देसहायक पोलीस आयुक्तपदी रुजू

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जिवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले. देश हादरवून सोडणाºया या हल्ल्याच्या तपास करणारे तसेच हा हल्ला घडवून आणणारा क्रूरकर्मा, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर टांगण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे तत्कालीन तपास अधिकारी केशव सखाराम शेंगळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना २६/११ च्या आठवणी ताज्या केल्या.मूळचे मुंबईतील रहिवासी असलेले शेंगळे १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतरची सलग २७ वर्षे मुंबई पोलीस दलात सेवा देताना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाºया सांभाळल्या.९ जुलैला त्यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर नागपुरात बदली झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात रुजू होण्यासाठी आल्याचे कळाल्यानंतर लोकमतने त्यांना गाठले. २६/ ११ च्या आव्हानात्मक तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला.२६/११ चा हल्ला म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. हा हल्ला करणारा केवळ एक दहशतवादी जिवंत हाती लागला होता आणि केवळ ९० दिवसांत या हल्ल्याचा तपास पूर्ण करायचा होता. हे आव्हान आम्ही स्वीकारले होते. त्यासाठी मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वात मी आणि अन्य १० (एकूण १२) अधिकारी तसेच १५० कर्मचाºयांची चमू रात्रंदिवस तपास कामात गुंतली होती. मरण्याच्या तयारीनेच आलेला क्रूरकर्मा कसाब काही बोलायला तयार नव्हता. देश हादरवणाºया या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, हे सांगण्यासाठी तो आढेवेढे घेत होता. पोलिसांच्या चौकशीला टाळत होता. त्याच्या भाषेला पंजाबी टच होता. स्पष्ट हिंदी बोलत नसला तरी त्याला सारेच समजायचे. त्यामुळे तपास पथकाशी संबंधित पंजाबी महिलांकडून त्याची भाषा समजण्यास मदत होत होती. काहीही बोलायला, विचारायला गेलो की तुम्हारे पास पिस्तूल है... निकालो और मुझे शूट कर दो... मै घबराता नही... असे म्हणायचा. आम्ही जन्नतमध्ये जाण्यासाठीच भारतात आलो. त्याच्याजवळ बनावट आयडी प्रूफ होते. त्यामुळे तो जिवंत हाती लागला म्हणूनच पाकिस्तानी असल्याचे आणि या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे आपण सिद्ध करू शकलो. ९० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आव्हान होते. १२ अधिकारी आणि १५० कर्मचाºयांच्या तपास पथकांसह अनेक वरिष्ठांनी रात्रीचा दिवस करून हे आव्हान पेलले. त्या दिवसात कुणी झोपण्याची कल्पनाही करीत नव्हते अन् कुणाला झोपही येत नव्हती. तपासादरम्यानच्या थरारक अनुभवाने आजही अंगावर शहारे उभे राहतात. भक्कम पुराव्याची साखळी जोडल्या गेल्यामुळे कसाबला फासावर टांगता आले. भारतावर सर्वात मोठा हल्ला करणाºया पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर टांगण्यासाठी करण्यात आलेल्या तपास पथकात आपण खारीचा वाटा उचलला, ही आपल्यासाठी कायम अभिमानाची बाब राहणार आहे, असेही शेंगळे यांनी सांगितले.१६ निघाले, ६ परतले !२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखला गेल्यानंतर भारताकडे कसाबसह १६ पाकिस्तानी दहशतवादी निघाले. मात्र, त्यातील सहा जण वेगवेगळ्या कारणामुळे माघारी परतले. येथील हिंदू असो अथवा मुसलमान, छोटे मूल असो की वृद्ध, माणसं असो की जनावरं सारेच्या सारेच आमचे शत्रू आहेत, असे तो सांगत होता. त्यांना संपवण्यासाठीच आम्ही आलो. ‘मिशन संपल्यानंतर शेवटचा बॉम्बस्फोट घडवून स्वत:ही आत्मघात करण्याचा त्यांचा कट होता’, असे कसाबने अखेर तपास अधिकाºयांना माहिती देताना कबूल केले होते.