शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

१३,५६३ बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा : विभागीय आयुक्त संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:14 IST

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभोजन व औषध आदींची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. निवारागृहातील विस्थापितांसाठी १४१ सामूहिक किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज सोमवारी दिली.‘लॉकडाऊन’च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत. बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.अशी आहे जिल्हानिहाय व्यवस्थाजिल्हा                     निवारागृहे           नागरिकांची व्यवस्थानागपूर                    ७३                     ८,१७९वर्धा                         ७                       २४०भंडारा                    ९                       १०३२गोंदिया                  ८                       १७२३चंद्रपूर                    ८                       १६५०गडचिरोली            ३६                      ७३९१४१ सामूहिक किचनची सुरुवातजमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांचीनिवारागृहात सुविधा करण्यात आली आहे. निवारागृहातील नागरिकांसाठी भोजनाची सुविधा १४१ सामूहिक किचनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात ७३, वर्धा ७, भंडारा ९, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी ८ व गडचिरोली जिल्ह्यातील ३६ सामूहिक किचनची सुविधा करण्यात आली आहे. सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच राहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापितांच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMediaमाध्यमे