शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याने लवकर घरी यावे म्हणून धाक दाखवायला गेली आणि जीव गमावून बसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:23 IST

रागाच्या भरात मुंग्या मारण्याचे घरातील कीटकनाशक शमशादने हाती घेतले आणि पतीला धाक दाखविण्यासाठी ते खाऊन घेतले.

ठळक मुद्देकळमन्यातील घटनेने हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेरुन दारु पिऊन आलेल्या नवऱ्याला धाक दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला.शमशाद एजाज शेख (वय २५) असे या दुर्देवी घटनेतील मृतक महिलेचे नाव आहे. ती कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी नगरात राहात होती. एजाज शेख यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सहा वर्षापूर्वी शमशादसोबत लग्न झाले होते. एजाज खाजगी नोकरीला आहे. कामाच्या निमित्ताने त्याला घरी पोहोचण्यासाठी मंगळवारी रात्री उशीर झाला. त्यात तो दारू पिऊन आल्याचे पाहून शमशादने एजाजसोबत वाद घातला.रागाच्या भरात मुंग्या मारण्याचे घरातील कीटकनाशक शमशादने हाती घेतले आणि पतीला धाक दाखविण्यासाठी ते खाऊन घेतले. काही वेळानंतर शमशाद ओकाऱ्या करू लागली. विषाने अंमल दाखवल्याचे लक्षात येताच पहाटे २ च्या सुमारास एजाजने आजूबाजूच्यांना आणि तिच्या माहेरच्यांना माहिती देऊन लगेच तिला मेयो इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

माहिती कळताच कळमनाचे पोलीस उपनिरीक्षक दहिफळे आणि हवलदार नरेश रेवतकर यांनी मृत शमशादच्या माहेरच्यांना, सासरच्यांना तसेच आजूबाजूच्यांना विचारणा केली. शमशाद आणि एजाज या दोघांचा संसार सुखी होता. नवऱ्याने रोज लवकर घरी यावे यासाठी सहज धाक दाखवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे चौकशीतून उघड झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.चिमुकल्याचे हरविले मातृछत्रया घटनेमुळे दोन निरागस जीवांचे मातृछत्र हरविले आहे. शमशादला एक पाच वर्षांचा आणि दुसरा सहा महिन्यांचा चिमुकला आहे. रागाच्या भरात शमशादने करून घेतलेल्या या आत्मघाती कृत्यामुळे हे दोन निरागस जीव आईच्या ममतेपासून कायमचे पोरके झाले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या