शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मॉडेलिंग करायला आली अन् ‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2023 21:29 IST

Nagpur News मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार करून घेणाऱ्या दलालाला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील तरुणीची सुटकापोलिसांकडून देहव्यापारातील दलालाला अटक

नागपूर : मॉडेलिंग करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीच्या प्रयत्नांना यश आले नाही व घर सोडल्यानंतर ती देहव्यापाराच्या जाळ्यात अडकली. मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार करून घेणाऱ्या दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. विक्की राजू कदमवार (३१, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव असून त्याने हॉटेलमध्ये आंबटशौकिन ग्राहकांना तरुणींना पाठविण्याची बाब समोर आली आहे.

मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील २१ वर्षीय मुलीचे मुंबईत जाऊन मॉडेलिंग करण्याचे स्वप्न होते. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीच्या कुटुंबात आई- वडील व लहान भावंडे आहेत. मॉडेल बनण्याच्या इच्छेने ती नागपूरच्या काही लोकांच्या संपर्कात आली. फोटो सेशनसाठी ती शहरात येऊ लागली. दरम्यान, वर्षभरापूर्वी तिथी जयताळा येथील एका विद्यार्थिनीशी ओळख झाली. मॉडेलिंगमधून कमाई करू शकत नाही ही बाब तिच्या लक्षात आली. जयताळा येथील संबंधित विद्यार्थिनीने तिला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी तयार केले. विद्यार्थिनीच्या माध्यमातून भेटलेल्या ग्राहकाने तिची विक्कीशी ओळख करून दिली. त्यानंतर विक्कीने तिला अनेक ग्राहकांकडे पाठविले. पीडित विद्यार्थिनी विकीच्या सांगण्यावरून ‘फोटो शूट’च्या नावाखाली नागपुरात येऊन वेश्याव्यवसाय करत असे. याची माहिती एसएसबीच्या पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना मिळाली. एका डमी ग्राहकामार्फत त्यांनीविक्कीशी संपर्क साधला. विकीने आठ हजार रुपयांत सौदा केला. त्याने डमी ग्राहकाला मनीषनगर येथील हॉटेल डेस्टिनीमध्ये बोलावले. तेथे डमी ग्राहकाकडून पैसे घेताच पोलिसांनी विक्कीला पकडले. विकी जुन्या ग्राहकांच्या माध्यमातून आलेल्या लोकांनाच सेवा देतो. ग्राहकाकडून मिळालेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम तरुणीला दिली जात होती. तरुणीच्या नातेवाइकांना मुलीचे सत्य माहिती नाही. विक्कीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून देहव्यापाराचे रॅकेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की हा गेल्या काही वर्षांपासून देहव्यापार दलालीचे काम करतो. त्याने अनेक अल्पवयीन आणि शाळकरी मुलींना देहव्यापारात ढकलून आंबटशौकिन ग्राहकांकडे पाठविल्या आहेत. कोरोनापूर्वी विक्की बेरोजगार होता. लॉकडाऊनपासून तो या व्यापारात उतरला. अगोदर तो मित्रांना काही तासांसाठी पाचशे रुपयात खोली भाड्याने द्यायचा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट