शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बकरीने दिला सात हजारवर महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:57 IST

बकरी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची एवढाच समज ग्रामीण भागात आहे. पण बकरीच्या निरुपयोगी घटकापासून उद्योगाला चालना मिळू शकते, हे दाखवून दिले यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी. जिल्ह्यातील सात हजारावर महिलांना बकरीपासून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच्या दुधापासून तयार केलेले साबण, खत आणि इतर साहित्याच्या विक्रीचा स्टॉल नागपुरात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरसमध्ये आहे.

ठळक मुद्देबकरीच्या दुधापासून तयार केली ‘गोट मिल्क सोप’ : पंतप्रधानांनी केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बकरी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची एवढाच समज ग्रामीण भागात आहे. पण बकरीच्या निरुपयोगी घटकापासून उद्योगाला चालना मिळू शकते, हे दाखवून दिले यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी. जिल्ह्यातील सात हजारावर महिलांना बकरीपासून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच्या दुधापासून तयार केलेले साबण, खत आणि इतर साहित्याच्या विक्रीचा स्टॉल नागपुरात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरसमध्ये आहे.विदर्भ पशु संशोधन उन्नती केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या अर्थकारणाला बळ मिळू लागले आहे. शासनाच्या ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडातून आर्थिक मदत झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ७०० महिला बचत गटांना बकरी पालनासाठी निधी उपलब्ध करून दिला. या बचत गटांना विदर्भ पशु संसाधन उन्नती केंद्राच्या माध्यमातून जोडण्यात आले. प्रत्येक तालुक्यात बचत गटांतील महिलांपैकीच ६० पशुसखी तयार करण्यात आल्या. या पशुसखींना बकरीवर प्राथमिक उपचारासह साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. पशुसखी बचत गटांकडून बकरीचे दूध व लेंड्या खरेदी करतात. बाबुळगाव तालुक्यातील केंद्रावर पशुसखींनी गोळा केलेल्या साहित्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यापासून खत, साबण, हॅण्डवॉश, पशुखाद्य तयार करण्यात येते. या साहित्याच्या पॅकेजिंगपासून मार्केटिंगपर्यंतचे काम या पशुसखी करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेत यवतमाळच्या महिला बचत गटांनी बकरीच्या दुधापासून तयार करण्यात येत असलेल्या साबणासंदर्भात माहिती दिली असता ते अवाक झाले. त्यांनी बचत गटांना भेटण्याचे आमंत्रणसुद्धा दिले. कुठल्याही रसायनाचा वापर न करता तयार केलेले हे साबण आरोग्यवर्धक असल्याचा दावा महिलांनी केला आहे. 

शेतावर मजुरी, घरोघरी भांडे घासणाऱ्या महिलांना मिळाला रोजगारगुरुमाऊली महिला बचत गट धापेवाडा येथील माला कोहाड यांनी ग्रामीण भागातील महिलांना उद्योगाची वाटचाल दाखविली आहे. ज्या महिला भांडे घासायच्या, शेतकाम करायच्या अशा महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. २७ बचत गटांच्या माध्यमातून २७० महिला या पुरुषांचे शर्ट शिवण्याचे काम गेल्या ४ वर्षापासून करीत आहे. या कामापासून महिलांना किमान ७ ते ८ हजार रुपये महिन्याला मिळकत आहे. महिला बचत गटांनी पारंपरिक साहित्य बनविण्यापेक्षा नाविन्यपूर्ण साहित्याची निर्मिती केल्यास त्यांना देशाच्या राजधानीत पोहचण्याची संधी आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे सरस पोर्टल तयार करण्यात येत आहे. यावर नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करणाºया बचत गटांच्या वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. शिवाय दिल्ली येथे सरस गॅलरी तयार करण्यात आली आहे. तिथे सुद्धा असे महिला बचत गट आपल्या वस्तू विक्री करू शकतात.एच.आर. मीना, अवर सचिव, ग्रा.वि. मंत्रालय, केंद्र सरकार

टॅग्स :milkदूधWomenमहिला