शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

‘ती’ बनली वंचित आदिवासींची ‘आरोग्यदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 10:04 IST

एमबीबीएसनंतर आपल्या एक वर्षाच्या बॉण्डमधून रुग्णसेवेसाठी तिने अगदी ठरवून गडचिरोलीचे दुर्गम खेडे निवडले. डॉ. रितु दमाहे असे या तरुण डॉक्टरचे नाव.

ठळक मुद्देएमबीबीएसनंतर जाणीवपूर्वक निवडले गडचिरोलीचे दुर्गम खेडे

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली म्हणजे राज्याचे शेवटचे टोक. २४ तास नक्षल्यांची दहशत, रस्ते नाहीत, वीज नाही, चारीकडे निबिड अरण्य आणि या अरण्यात मुक्त संचार करणारे हिंस्र पशू. या जिल्ह्यात नोकरी आजही अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षा वाटते. इथे एखाद्याची बदली झालीच तर तो सारी शक्ती पणाला लावून ती रद्द करतो. परंतु नुकतीच डॉक्टर झालेली एक तरुणी मात्र फारच जिगरबाज निघाली. एमबीबीएसनंतर आपल्या एक वर्षाच्या बॉण्डमधून रुग्णसेवेसाठी तिने अगदी ठरवून गडचिरोलीचे दुर्गम खेडे निवडले. डॉ. रितु दमाहे असे या तरुण डॉक्टरचे नाव. बालपण ते तरुणपण निव्वळ गरिबी पाहिलेली ही तरुणी डॉक्टर झाल्यावरही बदलली नाही अन समाजाचे ऋण फेडण्यासाठी थेट गडचिरोलीला पोहोचली. तिचीच ही साहसकथा...मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कुमली या छोट्याशा गावातील डॉ. रितु दमाहे. वडील शेतकरी. भूक परवडली, पण आजार नको तिने लहानपणीच पाहिलेले. म्हणूनच की काय अभ्यासाच्या जोरावार वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानंतर ग्रामीण रुग्णालयात एक वर्ष ‘इन्टर्नशिप’ तर दुसऱ्या वर्षी मेडिकल अधिकारी ‘एमओशिप’ करावी लागते. परंतु एमबीबीएसला विचारते कोण, म्हणून बहुसंख्य विद्यार्थी कशीतरी इन्टर्नशिप पूर्ण करून ‘एमओशिप’ म्हणजे ग्रामीण भागात रुग्णसेवा देण्याच्या बॉण्डमधील पळवाटांना जवळ करतात. कुणी पैसे देऊन, कुणी ओळखीने तर कुणी विविध मार्गाने या बॉण्डला बगलच देतात. अशी विदारक स्थिती असतानाही डॉ. रितु दमाहे हिने आपल्या ‘बॉण्ड’मधून रुग्णसेवा घडण्यासाठी कुठल्या ग्रामीण रुग्णालयाची निवड केली नाही तर शासनाच्या प्रकल्पातील सर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘मा दंतेश्वरी फिरता दवाखान्या’ची निवड केली. या दवाखान्याची निवड फारसे कुणी करीत नाही. कारण, जिथे रस्ते नाहीत, वीज नाही, सोई नाहीत अशा लांब पट्ट्यातील गावांमध्ये हा दवाखाना जाऊन रुग्णसेवा देतो. या गावामध्ये जाऊन रुग्णसेवा देण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कितीतरी तास हा प्रवासात जातो आणि तोही खाच खळग्यातील सीटवरून, उसळतच चालणारा प्रवास. त्या फिरत्या दवाखान्यातून रुग्णसेवा देताना तिला येत असलेले अनुभव विचार करायला लावणारे असेच आहेत. फोनवरून तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात उपचाराच्या सोई पोहचलेल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु डॉक्टर राहत नाही. गरिबी तर पाचवीला पुजलेली. अंग झाकायला जिथे चिंध्या आहेत, तिथे स्वत:च्या आरोग्याची कोण पर्वा करणार. एक वेळचं पोटभर जेवण मिळालं तरी तिथे भाग्य लाभलं हा समज. भूक मिटविण्यासाठी चघळला जाणारा तंबाखू, यातून नंतर समोर येणारे विविध आजार. गावात फिरता दवाखाना आला म्हणून उपचार, नाही तर अंगावर आजार काढले जातात किंवा वैदूचा झाडपाल्याचा उपचार आहेच. अनेकवेळा फिरता दवाखाना येऊनही फारसे कुणी येत नाही. जे येतात ते फाटके त्यातही कमी फाटके असलेले कपडे घालून येतात. त्यांचा तो केविलवाणा चेहरा पाहताना काय झाले, हे विचारण्याचे धाडसही होत नाही. वृद्ध महिला चिंध्या गुंडाळून येतात. या चिंध्याही केवळ कंबरेखालची लाज झाकावी एवढ्याच. यांच्यावर कोणता उपचार करावा म्हणजे त्यांचे हे दारिद्र्य सुटेल हा, प्रश्न नेहमी पडतो. त्या स्थितीही त्यांना प्रेमाने विचारपूस आणि स्पर्श केल्यावर डबडबणारे त्यांचे डोळे पाहून स्वत:ला आवरणे कठीण होते. रोज अशा नवनव्या प्रसंगातून जाते. भविष्यात अशाच रुग्णांसाठी आपली सेवा समर्पित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला बळ देते.

टॅग्स :Healthआरोग्यGadchiroliगडचिरोली