शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चावर बारीक नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:09 IST

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जे. पवित्र कुमार यांनी दिल्या.

ठळक मुद्देनिवडणूक निरीक्षक विनोद कुमार व जे. पवित्र कुमार यांच्या मार्गदर्शनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जे. पवित्र कुमार यांनी दिल्या.यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रामटेक लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह प्रामुख्याने उपस्थित होत्या.रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची कामे कशी करावी, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात आयोजित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च नियंत्रक समिती व खर्च नियंत्रक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवाराने खर्च करणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात व्हिडीओ पथक तैनात करण्यात आले आहेत.या पथकाद्वारे दररोज अहवाल मागविण्यात येत आहे. उमेदवाराने अतिरिक्त खर्च केल्यास त्यांना स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास त्यांच्या निवडणूक खर्चात हा हिशोब लावण्यात येईल. सदर प्रकरण हे उमेदवार किंवा संबंधित राजकीय पक्षाचे असल्यास सदर पक्षाला हिशोब विचारण्यात येईल. समाज माध्यम, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच स्थानिक केबल वाहिन्या यावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आदर्श आचारसंहितेसोबतच निवडणूक काळात उमेदवारांकडून दररोज होणाऱ्या खर्चासंबंधी आढावा घेण्यासाठी ऑडिओ व्हिडीओग्राफीची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच उमेदवारांना आपल्या खर्चाबाबतचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, सामाजिक माध्यम तसेच दृकश्राव्य माध्यमांवर जाहिरातीच्या तपशीलाची माहिती दररोज घेण्यात यावी व यासंबंधीची संपूर्ण माहिती खर्चविषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण समितीमार्फत विविध राजकीय पक्षांना प्रचार साहित्याबद्दल प्रमाणित करून देण्यासाठी एमसीएमसीमार्फत नियमित कार्यवाही करण्यात येणार आहे.निवडणूक काळात दारूची वाहतूक तसेच अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर विविध पथके तयार करण्यात आली आहे. निवडणूक काळात दारूच्या विक्रीसंदर्भात उत्पादन शुल्क विभागातर्फे रिटेल दुकानांची नियमित तपासणी करून उपलब्ध स्टॉक व विक्री यासंदर्भात दररोज मॉनिटरींग करण्याची सूचना खर्चविषयक निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी दिली.निवडणूक खर्चविषयक नोडल अधिकारी मोना ठाकूर यांनी निवडणूककाळात प्रत्येक उमेदवारांच्या खर्चाचा तपशील ठेवण्यात येणार असून नोडल अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा दैनंदिन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाबाबत ठेवावयाच्या विविध नोंदीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी वरिष्ठ अधिकारी व निवडणूक कार्यातील अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय